scorecardresearch

अखेर ठरलं! परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या नात्यावर शिक्कामोर्तब; ‘आप’ खासदार ट्वीट करत म्हणाले…

Raghav Chadha Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढांचं लग्न ठरलं? आप खासदारांनी ट्वीट करून केलं शिक्कामोर्तब

Parineeti Chopra And Aap Mp Raghav Chadha
परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या साखरपुड्याची चर्चा (संग्रहित छायाचित्र)

Raghav Chadha Parineeti Chopra Relationship: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. दोघांच्या नात्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांची बोलणीही सुरू असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता या दोघांच्या नात्यावर आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून शिक्कामोर्तब केलंय.

परिणीती चोप्राशी लग्न कधी करणार? या प्रश्नावर खासदार राघव चड्ढा लाजत म्हणाले…

“राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा” असं खासदार संजीव अरोरा म्हणाले.

राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे आणि त्यांचे अनेक कॉमन मित्र आहेत. एका रिपोर्टनुसार त्यांच्या कुटुंबियांनी लग्नाबद्दल बोलणी सुरू केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, परिणीती व राघव या दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाबाबत चर्चा सुरू केली आहे. अशातच आप खासदारांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 15:25 IST

संबंधित बातम्या