Video: शाहरुखला भेटण्यासाठी अब्दु रोजिक पोहोचला मन्नतबाहेर, त्याला पाहताच किंग खानच्या चाहत्यांनी असं काही केलं की... | Abdu rozik waited outside mannat to meet shahrukh khan | Loksatta

Video: शाहरुखला भेटण्यासाठी अब्दु रोजिक पोहोचला ‘मन्नत’बाहेर, त्याला पाहताच किंग खानच्या चाहत्यांनी असं काही केलं की…

आतापर्यंत त्याने भारतातील अनेक नामवंत कलाकारांची भेट घेतली आहे. आता शाहरुख खानची भेट घेण्यासाठी तो आतुर झाला आहे.

abdu shahrukh

शाहरुख खानचं प्रचंड मोठं फॅन फॉलोईंग आहे. आता ‘पठाण’ या चित्रपटातून चार वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. त्याच्या वाढदिवशी अनेक जण त्याच्या मन्नत या बंगल्याबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमतात. सध्या ‘पठाण’ या त्याच्या चित्रपटामुळे तशीच चाहत्यांची गर्दी त्याच्या बंगल्याबाहेर पहायला मिळत आहे. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर जाण्यापासून अब्दुल रोझिकही स्वतःला रोखू शकला नाही.

‘बिग बॉस १६’ मुळे अब्दुल रोजिकचा भारतातला चाहतावर्ग प्रचंड वाढला आहे. तो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. आतापर्यंत त्याने भारतातील अनेक नामवंत कलाकारांची भेट घेतली आहे. आता शाहरुख खानची भेट घेण्यासाठी तो आतुर झाला आहे. त्यामुळे नुकताच तो किंग खानच्या मन्नत बंगल्याबाहेर पोहोचला होता. त्या वेळेचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : चित्रपटगृहात सुपरहिट पण IMDB वर निघाली ‘पठाण’ची हवा, ‘इतक्या’ प्रेक्षकांनी दिलं १० पैकी १ रेटिंग

काल अब्दु त्याच्या कारमधून शाहरुखच्या बंगल्या बाहेर पोहोचला. तो तिथे पोहोचताच त्याच्या कारच्या सनरूफमधून उभा राहिला. यावेळी त्याने त्याच्या गळ्यात एक बोर्ड लटकवला होता. त्यात त्यांने लिहिलं होतं, “तुला भेटल्याशिवाय माझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे शाहरुख खान. तुझ्या सर्व चाहत्यांसोबत इथे बसून मी तुला कधी भेटणार याची वाट पाहताना मला खूप आनंद होत आहे.”

हेही वाचा : फक्त सलमानच नव्हे तर आमिर खानच्या बहिणीनेही ‘पठाण’मध्ये साकारली आहे महत्वपूर्ण भूमिका, तुम्ही तिला ओळखलंत का?

अब्दु शाहरुखच्या घराबाहेर पोहोचतात शाहरुखच्या चाहत्यांनी अब्दुला भरभरून प्रेम दिलं. अब्दुबरोबर फोटो काढण्यासाठी तिथे जमलेले चाहते गर्दी करू लागले. तर अब्दुदेखील अगदी आनंदाने त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत होता. अब्दूची वेशभूषा सुद्धा विशेष लक्ष वेधून घेत होती. शाहरुखची झलक पाहण्यासाठी जाताना अब्दूने काळ्या रंगाचे जॅकेट, टी-शर्ट, पॅन्ट परिधान केले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 11:31 IST
Next Story
Video: हातात दारुचा ग्लास अन् कंगना रणौतचा डान्स; पार्टीतील व्हिडीओमुळे अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले “हिंदू धर्म…”