scorecardresearch

Premium

Video: एक हात गमावला, दुसऱ्या हाताने गाजवलं मैदान; अभिषेक बच्चन व सैयामी खेरच्या बहुप्रतीक्षित ‘घुमर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ghoomer

सध्या अनेक बॉलीवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. काही आगामी चित्रपटांची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघत आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिषेक बच्चनचा ‘घुमर ‘ हा चित्रपट. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं. तर आता या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर यात तो पॅराप्लेजिक खेळाडूला प्रशिक्षण देताना दिसतोय. या खेळाडूची भुमिका अभिनेत्री सैयामी खेर साकारणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत.

jawan
शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर घालणार धुमाकूळ; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
Bobby Deol first look posters from Ranbir Kapoor starrer Animal
रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकणार बॉबी देओल; त्याचा जबरदस्त लूक पाहून चाहते म्हणाले, “सिस्टम हँग केलं…”
prasad
अखेर कोडं सुटलं! ‘जिलबी’ चित्रपटात प्रसाद ओकबरोबर दिसणार ‘हे’ आघाडीचे मराठी कलाकार
Abhishek
“अभिषेक बच्चनने मिरचीचा ठेचा भाजीसारखा खाल्ला आणि…”, सैयामी खेरने सांगितली पुण्यातील शूटिंगदरम्यानची आठवण

आणखी वाचा : “लोकांनी तुझी खिल्ली उडवली पण तू…” लेकाच्या उत्कृष्ट कामगिरीचं अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुक

या ट्रेलरची सुरुवात अभिषेक बच्चनच्या डायलॉगने होते, यात मद्यधुंद अवस्थेत दिसतो. तर या चित्रपटात सैयामी खेरचा बॉयफ्रेंड अंगद असतो. पण तिच्यासाठी क्रिकेट तिच्या प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. सैयामीची भारतीय संघात निवड झाल्यानंतर तिच्या आयुष्यात मोठं वादळ येतं आणि एका अपघातात तिचा एक हात तिला गमवावा लागतो. त्यानंतर तिच्या संघर्षाची कथा सुरु होते. मग तिची संघर्ष गाथा आणि त्यानंतर तिला मिळणारं फळ काय, हे आपल्याला या चित्रपटात पहायला मिळेल.

हेही वाचा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्ने अभिषेक बच्चनची एकदाच नव्हे तर दोनदा घेतली दखल; कारण वाचून व्हाल थक्क

या चित्रपटाची कथा हंगेरियन नेमबाज कॅरोली टाक्स हिच्या कथेपासून प्रेरित आहे. तिच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानंतर तिने डाव्या हाताने खेळून दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली होती. आर. बल्की यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abhishek bachchan and saiyami kher starrer ghoomer film trailer released rnv

First published on: 04-08-2023 at 19:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×