Abhishek Bachchan reveals why he is scared of walking the red carpet with wife Aishwarya Rai : बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या आता जरी पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी त्या त्यांच्या पतीपेक्षाही अधिक यशस्वी आहेत. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्यानं आतापर्यंत अनेक चित्रपटात काम करत तिच्या सहज सुंदर अभिनयानं आणि सौंदर्यानं अनेकांची मन जिंकली. अभिषेक व ऐश्वर्या यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र कामसुद्धा केलं आहे. पण, ऐश्वर्याच्या नावे तुलनेनं अधिक हिट चित्रपट आहेत.

९०च्या काळात ऐश्वर्यानं तिच्या सौंदर्यानं अनेकांची पसंती मिळवली. अभिनेत्रीचे लुक्स अनेकदा सोशल मीडियावरही वायरल होत असतात. तर रेड कार्पेटवरील तिची हजेरी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अशातच आता तिचा नवरा अभिषेक बच्चननं स्वतः याबद्दल सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं ऐश्वर्याबरोबर त्याला रेड कार्पेट वर जायला भीती वाटते असं म्हटलं आहे. अभिषेक बच्चन असं का म्हणाला याबद्दल जाणून घेऊयात…

ऐश्वर्या रायबरोबर रेड कार्पेटवर जाण्याबद्दल अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया

लिली सिंहशी संवाद साधताना अभिषेकनं ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. पण, यावेळी त्यानं त्याला ऐश्वर्याबरोबर रेड कार्पेटवर जाण्याची भीती वाटते असंही म्हटलं आहे. अभिनेता बायकोबद्दल म्हणाला, “तुम्ही माझ्या बायकोला कधी रेड कार्पेटवर पाहिलं आहे का? माझ्यासाठी रेड कार्पेटवर जाणं हेच मुळात कठीण असतं आणि त्यात जर तिच्यासोबत जावं लागलं, तर ते अधिकच दडपण आणणारं असतं. तिथं सर्व लोक यात तरबेज असतात, पण मी मात्र एखा ताठ उभा राहतो. हात खिशात ठेवू की काय करू, अशा विचाराने मला संकोच वाटतो.”

Award Banner

अभिषेकनं पुढे रेड कार्पेटवरील एक गमतीशीर किस्सा सांगितला आहे. अभिनेत्यांनं एकदा असंच रेड कार्पेटवर असताना कसं उभं राहायचं किंवा स्वतःला कसं प्रेझेंट करायचं याबद्दल त्याला संकोच वाटत असल्यानं तो खूप गंभीर झाला होता. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरील गंभीर हावभाव पाहून पापराझींना आपल्याकडून काही चूक झाली का असं वाटलं.

अभिषेक याबद्दल म्हणाला, “एकदा असंच रेड कार्पेटवर मी खूप गंभीर हावभावात त्यांना दिसलो आणि ते मला येऊन विचारायला लागले की सर आमच्याकडून काही चुकलं आहे का? तेव्हा मला खरंच हसू आलेलं.”