Akshay Kumar fitness routine and daily habits : बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार त्याच्या कडक शिस्तबद्ध दिनचर्येसाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये रितेश देशमुख आणि अक्षयबरोबर आलेल्या अभिषेक बच्चनने अक्षयच्या सेटवरील अनोख्या ‘पार्टी’बद्दल सांगून सगळ्यांना हसवले होते. “अक्षय ८ तासांपेक्षा जास्त काम करत नाही. काम संपल्यावर ५० किमी दूर हॉटेलवर चालत जायला सांगतो आणि जेवणात फक्त उकडलेले गाजर, अंडी आणि पालक खातो,” असा मजेशीर किस्सा अभिषेक बच्चनने शेअर केला.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्याबरोबर ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिषेकने हा किस्सा सांगितला होता. कपिल शर्माने अभिषेकला विचारलेलं की, शूटिंगदरम्यान ते अक्षयबरोबर कधी पार्टी करतात का? त्यावर अक्षय हा पार्टीसाठी रात्री उशिरापर्यंत जागणारा माणूस नाही, असं उत्तर अभिषेक बच्चनने दिलं होतं.
अक्षय कुमारचे सेटवरील रुटीन कसे असते?
अक्षय सेटवर एका कडक नियम पाळतो. तो त्याचे काम आठ तासांच्या आत पूर्ण करतो आणि त्यानंतर त्याच्या फिटनेस रुटीनकडे वळतो, असं अभिषेकने सांगितलं होतं. “अक्षय कुमारकडे पाहा, असं वाटतं जणून गेली ५-६ वर्षे तो जेवलाच नाहीये. तो कॉफी, चहा किंवा कोल्ड ड्रिंक्स पीत नाही. तो गोड पदार्थही खात नाही. अक्षयबरोबर पार्टी करणं हा वेगळाच प्रकार असतो. शूटिंग संपणं हा अक्षयचा सर्वात आवडता क्षण असतो. तो ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम करत नाही. सकाळी ७ वाजता सेटवर आल्यापासून पुढील ८ तासांत तो सगळी कामे उरकतो. काम संपल्यानंतरच्या पार्टीसाठी तो तुम्हाला सायकल चालवत किंवा चालत हॉटेलवर जाण्यास सांगतो,” असं अभिषेक बच्चन म्हणाला.
अक्षय कुमार ५० किलोमीटर चालायला सांगतो – अभिषेक बच्चन
“शूटिंग संपल्यानंतर हॉटेल जर ५० किलोमीटर दूर असेल, तरीही तो आम्हाला तिथे चालत जायला सांगतो. यातून त्याला सर्वाधिक आनंद मिळतो. तो अगदी सहज पोहोचायचा, पण मी आणि रितेश मधेच थांबून टॅक्सी करायचो. तिथे पोहोचल्यावर तो आम्हाला ५० लॅप्स स्विमिंग करायला सांगायचा. रितेश १० लॅप्सनंतर थकून जायचा, मग मी त्याला मदत करायचो आणि मीही थकायचो, शेवटी ट्रेनरलाच आमची मदत करावी लागायची. या सगळ्यानंतर जेवणाच्या वेळी मी आणि रितेश बटर चिकनचा विचार करायचो. पण अक्षय मात्र उकडलेले गाजर, पालक आणि अंडी खायचा. पोळी किंवा भातही नाही. मग तो म्हणायचा की उद्या सकाळी आपण चालत सेटवर जाऊ. ही त्याची पार्टी असते,” असं अभिषेक बच्चन म्हणाला.
अक्षयबरोबर एक दिवस घालवल्यावर तुम्ही इतके थकता की रात्री ९ वाजता झोपण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो, असं अभिषेकने सांगितलं.
अक्षय कुमार लवकर का जेवतो?
दरम्यान, अक्षय कुमार दिवसातील ८ तास काम करतो आणि रात्री ९ वाजता झोपतो. “संध्याकाळी जेवणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण रात्री झोपतो, तेव्हा आपले डोळे, पाय, हात—शरीराचा प्रत्येक भाग विश्रांती घेत असतो. पण ज्याची विश्रांती होत नाही ते म्हणजे आपला पोट, कारण आपण उशिरा जेवलेलो असतो. त्यामुळे लवकर जेवल्याने जेवण व्यवस्थित पचतं आणि पोटाला पुरेसा आराम मिळतो,” असं अक्षय कुमार सांगतो.
