बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने नुकताच त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा केला. यंदाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अभिषेक हा पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्यासह मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. काही दिवसांपूर्वी अभिषेक हा मुंबईत परतला. आता त्याने सोशल मीडियावर मालदिवच्या सुट्ट्यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
अभिषेक बच्चन हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर मालदिवच्या सुट्ट्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या पोस्टमध्ये अभिषेकने मालदीवचा समुद्र, सूर्यास्त आणि रिसॉर्टचे काही फोटो शेअर केले आहेत.
आणखी वाचा : “मला बेडरुमबाहेर झोपावं लागलं होतं, कारण ऐश्वर्या…” अभिषेक बच्चनने सांगितलेला ‘तो’ किस्सा
“सूर्याबरोबर आणखी एका सहल साजरी केली. हा वीकेंड अगदीच उत्तम होता. माझ्यासाठी ही सहल कायमच स्मरणात राहील. यासाठी मी आभार मानतो. आम्हाला आमचा वेळ खूप छान घालवता आला. सुंदर दृश्ये, सुंदर लोक आणि कृतज्ञता”, असे कॅप्शन अभिषेक बच्चनने दिले आहे.
त्याबरोबर अभिषेकने मालदीवच्या ट्रीपचे आणखीही काही फोटोही पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करताना अभिषेकने “आणखी काही सुंदर दृश्यं, विशेषत: शेवटचे…” असे म्हटले आहे. “माझा वाढदिवस खास बनवल्याबद्दल आभार”, असेही अभिषेकने ही पोस्ट शेअर करताना म्हटले आहे.
या फोटोत अभिषेकने मालदीव, तेथील नैसर्गिक सौंदर्य, समुद्र पाहायला मिळत आहे. त्याबरोबर त्याने शेवटी पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचा एक सुंदर फोटोही पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करताना त्याने ‘सुंदर दृश्य’ असं म्हटले आहे.
आणखी वाचा : “विराजसशी लग्न झाल्यावर…” शिवानी रांगोळे सासूला कोणत्या नावाने हाक मारते? स्वत:च केला खुलासा
अभिषेक बच्चनच्या या फोटोंवर अनेक बॉलिवूड कलाकार कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. अभिषेक बच्चनच्या पोस्टवर अभिनेते अनिल कपूर यांनी इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. तर अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिषेक बच्चनप्रमाणेच अनेकांनी ऐश्वर्याच्या फोटोला सर्वात सुंदर फोटो असे म्हटले आहे.