बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपुत्र आणि प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिषेक लवकरच सैयामी खेरबरोबर ‘घुमर’ या चित्रपटात क्रिकेट कोचच्या भूमिकेत झळकणार आहे. याच्या प्रमोशनमध्ये सध्या संपूर्ण टीम व्यस्त आहे. अभिषेक बच्चनही यासाठी वेगवेगळ्या लोकांना मुलाखती देत आहे. अशातच एका मुलाखतीदरम्यान अभिषेकने आपल्या आई वडिलांबरोबर राहण्याबद्दल भाष्य केलं आहे.

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये नुकतंच अभिषेकने हजेरी लावली अन् मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच पॉडकास्टमध्ये अभिषेक अजूनही त्याच्या पालकांबरोबर राहतो याबाबतीत विचारण्यात आलं. यावर अभिषेक म्हणाला, “आजच्या मुंबईसारख्या शहरातील धकाधकीच्या जीवनात तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी फारच कमी वेळ मिळतो. मी माझ्या आई बाबांबरोबर न राहण्याचा विचारही करू शकत नाही. माझे वडील ८१ वर्षाचे आणि आई ७५ वर्षाची आहे, निदान त्यांचं वय पाहता तरी माझ्या मनात असा विचारही येत नाही.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

आणखी वाचा : जेव्हा भर कार्यक्रमात अश्लील हावभाव करत शाहरुखने प्रियांका चोप्राला घातलेली लग्नासाठी मागणी अन्…

पुढे याबद्दल अभिषेक म्हणाला, “तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवायला हवा, त्यांची काळजी घ्यायला हवी. माझे आई वडील सुदैवाने अजूनही कोणावर अवलंबून नाहीत पण तरी जेव्हा आपण आपला सांभाळ करण्यास असमर्थ होतो तेव्हा ते आपल्याबरोबरच होते, त्यामुळे आज जर त्यांना आपली गरज आहे तर आपण त्यांच्या जवळ असलंच पाहिजे.”

आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी बऱ्याच गोष्टींवर पाणी सोडलं अन् एकत्र कुटुंब पद्धती ही आपली भारतीयांची ओळख आहे असंही अभिषेकने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. “वयाच्या ४७ व्या वर्षीही मला माझ्या आई वडिलांचा सहवास लाभतो आहे यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो.” असंही अभिषेक म्हणाला. अभिषेकच्या ‘घुमर’ या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. आर बल्की दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्याबरोबर सैयामी खेर, अंगद बेदी, शबाना आजमी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. बिग बीसुद्धा यात छोट्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader