अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ यांची ५८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ऍलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम ४२०, ४०८, ४६५, ४६७ आणि ४६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०१८ रोजी, ऍलन यांची MMA मॅट्रिक्स कंपनीच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘एमएमए मॅट्रिक्स जिम’ टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयेशा श्रॉफ यांची आहे. टायगर त्याच्या कामात खूप व्यग्र असल्याने जिमचे सर्व काम आयेशा आणि ऍलन पाहतात. ऍलनने भारतात आणि परदेशात ११ स्पर्धा आयोजित करण्यासाठी कंपनीकडून भरपूर पैसे घेतले होते. डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०२३ पर्यंत कंपनीच्या बँक खात्यातून ५८ लाख ५२ हजार ५९१ रुपये काढण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

जॅकी श्रॉफ आणि त्यांची पत्नी आयशा यांनी १९८७ मध्ये लग्न केले होते. त्यांना टायगर आणि कृष्णा नावाची दोन मुले आहेत. आयशा ‘जॅकी श्रॉफ एंटरटेनमेंट लिमिटेड’ नावाच्या प्रोडक्शन हाऊस चालवतात. या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. आयशांनी चित्रपट निर्मितीबरोबरच अभिनयातही नशीब आजमावले आहे. १९८४ मध्ये आलेल्या ‘तेरी बहों में’ चित्रपटात त्यांनी काम केले होते. यामध्ये त्यांनी मोहनीश बहलसोबत स्क्रीन शेअर केली होती. मात्र, हा चित्रपट म्हणावी तशी जादू दाखवू शकला नाही. त्यामुळे आयशाने अभिनय सोडून निर्मिती क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ackie shroff wife ayesha shroff cheated of 58 lakh fir registered dpj
First published on: 09-06-2023 at 16:34 IST