Akshay Kumar : बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार सध्या ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे, यामुळे अक्षयच्या चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटासाठी अ‍ॅक्शन सीन शूट करत असताना अभिनेत्याच्या डोळ्याला लागले आहे. हवेने त्याच्या डोळ्यात एक बारीक वस्तू गेली, त्यामुळे त्रास होऊ लागला. अक्षयला त्रास सुरू झाल्यावर लगेचच चित्रपटाच्या सेटवर डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी अक्षयवर उपचार केले असून त्याच्या डोळ्याला एक पट्टी बांधली आहे. तसेच काही वेळ त्याला आराम करण्यास सांगितले आहे.

part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
urmila kothare first post after car accident
“रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या गाडीचा…”, अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट; सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Reshma Shinde Dance Video
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Ajith racing accident
Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?
Minor girl sexually assaulted by father in Dombivli
डोंबिवलीत वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
kangana ranaut makeup indira gandhi prosthetic make up
कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ

हेही वाचा : शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर अक्षय आराम करत आहे. ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगचे काम आता अंतिम टप्प्यात पोहचले आहे. त्यात अक्षयला दुखापत झाल्याने काम काही वेळ थांबले होते. मात्र, डॉक्टरांनी अक्षयला तपासल्यानंतर आणि त्याला आराम करण्यास सांगितल्यानंतर अन्य कलाकारांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

चित्रपटाचं शूटिंग अंतिम टप्प्यात असल्याने अक्षयसुद्धा लवकरच त्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगसह पुढील कामात कोणताही उशीर होऊ नये असं त्याला वाटतं, त्यामुळे लवकरच तो पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे.

‘हाऊसफुल ५’ चित्रपटात पुन्हा एकदा अक्षय आणि रितेश देशमुख यांची जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, चंकी पांडे, जॅकलिन फर्नांडिस यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. तसेच नाना पाटेकर, जॉनी लिवर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि फरदीन खान हे कलाकारदेखील महत्त्वाचे पात्र साकारणार आहेत.

हेही वाचा : राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?

या वर्षाच्या सुरुवातीलाच युरोपमध्ये ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. आता शूटिंग अंतिम टप्प्यात असून ६ जून २०२५ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१० पासून या कॉमेडी चित्रपटाच्या सीरिजने चाहत्यांना खळखळून हसवलं आहे. ‘हाऊसफुल’ आणि ‘हाऊसफुल २’ चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान यांनी केले होते. पुढे २०२१६ मध्ये ‘हाऊसफुल ३’ व २०१९ मध्ये ‘हाऊसफुल ४’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता तरुण मनसुखानी दिग्दर्शित ‘हाऊसफुल ५’ चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Story img Loader