देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आज दिल्लीत पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासन चर्चेत असणाऱ्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. या उद्घाटनाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. देशाच्या नव्या संसद भवनाचा लोकार्पण सोहळा सुरु असताना आता सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच एक ट्वीट केले आहे. यात त्याने नव्या संसद भवनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याबरोबरच त्याने ट्वीट करत देशाच्या नव्या संसद भवनाचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे…” ‘रावरंभा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

संसदेची ही भव्य नवी इमारत पाहून खरंच खूप अभिमान वाटतो. हे सदैव भारताच्या विकासाचे प्रतीक असू दे, माझी संसद माझा अभिमान, असे ट्वीट अक्षय कुमारने केले आहे.

अक्षय कुमारच्या या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही तुमचे विचार खूप छान पद्धतीने मांडले आहेत. आपली नवीन संसद ही खरोखरच आपल्या लोकशाहीचा दिपस्तंभ आहे. जे देशाचा समृद्ध वारसा आणि भविष्यातील उत्साही आकांक्षेचे प्रतिबिंब दर्शवते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “नक्की काय दाखवायचं आहे…” नव्या फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “मराठी इंडस्ट्रीमध्ये…”

दरम्यान अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये संसदेच्या प्रवेशद्वारापासून ते लोकसभा आणि राज्यसभेच्या आतील दृश्यांचा समावेश आहे. संसद भवनावर बसवण्यात आलेला अशोकस्तंभ या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याशिवाय संसदेच्या इमारच्या भव्य प्रवेशद्वारावर लिहिण्यात आलेलं ‘सत्यमेव जयते’ही ठळकपणे समोर येत आहे.

आणखी वाचा : Video: कशी आहे आपली नवी संसद? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला आतला व्हिडीओ!

लोकसभेच्या आतील दृश्यांचा या व्हिडीओत समावेश करण्यात आला आहे. तब्बल ८८८ सदस्य बसण्याची क्षमता असणारं हे भव्य सभागृह आहे. आधीच्या लोकसभेतील फक्त हिरव्या रंगाचं कारपेट न ठेवता त्या कारपेटवर नक्षीकाम असल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे.