अभिनेता व गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन यांचे मोठे भाऊ राम किशन शुक्ला यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी किशन यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या एका भावाचे कर्करोगाने निधन झाले होते. वर्षभरातच त्यांच्या दुसऱ्या भावाचे निधन झाल्याने रवी किशन यांच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार रवी किशन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘दुःखद… माझे मोठे भाऊ श्री राम किशन शुक्ला यांचे आज (रविवारी) दुपारी १२ वाजता मुंबईतील नानावटी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तुम्हाला त्यांच्या चरणी स्थान द्यावे अशी मी महादेवाला प्रार्थना करतो,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

दुसर्‍या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘राम किशन भाऊ खरोखरच आमच्या घरचे राम होते, त्यांचा शांत हसरा चेहरा फसवा नव्हता, त्यांच्या अचानक जाण्याने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. आज मी एकटाच राहिलो. त्यांच्या पुण्यवान आत्म्याला शांती लाभो, यासाठी सर्वांनी प्रार्थना करा.”

रवी किशनचे पीआरओ पवन दुबे यांनीही या निधनाची माहिती दिली आहे. रवी किशन यांचे मोठा भाऊ ५३ वर्षांचे होते. मुंबईत राहून ते रविकिशन यांच्या चित्रपट निर्मितीचे काम पाहायचे. ५ फेब्रुवारी रोजी अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गेली १८ वर्षे ते रवी किशन प्रॉडक्शनचे काम पाहत होते. रवी किशन यांना तीन भाऊ आहेत. राम किशन दुसऱ्या क्रमांकावरचे होते. त्यांना २५ वर्षांचा मुलगा असून तो सरकारी नोकरी करतो, तर त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor and gorakhpur bjp mp ravi kishan elder brother ram kishan passed away due to heart attack hrc
First published on: 06-02-2023 at 11:22 IST