बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाली झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. याबाबत अभिनेत्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. मुंबईतील वीरा देसाई परिसरात अनुपम खेर यांचं कार्यालय आहे. याच कार्यलयात चोरी झाल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत अनुपम खेर यांनी सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

अनुपम खेर यांनी या पोस्टसह त्यांच्या कार्यालयातील दरवाजाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या प्रकरणी आता एफआयआर दाखल करण्यात आला असून लवकरच संबंधित चोरट्यांना पकडलं जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. अनुपम खेर यांच्या कार्यालयातून चोरट्यांनी तिजोरी आणि एक बॉक्स चोरी करून नेल्याचं समोर आलं आहे. खेर यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एका बॉक्समध्ये त्यांच्या चित्रपटासंदर्भातील काही गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. दोन चोरट्यांनी दरवाजा तोडून त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला आणि ही चोरी केल्याची माहिती अभिनेत्याने या व्हिडीओमध्ये दिली आहे.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
What Amit Thackeray Said?
‘बिनशर्ट’च्या वक्तव्यावर अमित ठाकरेंचं काका उद्धव ठाकरेंना उत्तर, “राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने ज्यांचा मुलगा..”
Why Team India Players Are Wearing Black Armbands In Super 8 Clash
IND vs AFG सामन्यात भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? BCCI ने सांगितलं नेमकं कारण
Saurabh Netravalkar Exclusive Interview
“मला रंगांधळा म्हणत त्यांनी..”, सौरभ नेत्रावळकरने सांगितला भारत सोडण्याआधीचा किस्सा; म्हणाला, “दोन वर्षं मागितली..”

हेही वाचा : “पाठीवरुन हात फिरवला…”, नाना पाटेकरांना भेटून गौरव मोरे भारावला; फोटो शेअर म्हणाला…

अनुपम खेर सांगतात, “काल रात्री आमच्या वीरा देसाई परिसरातील कार्यालयात चोरी झाली. दोन चोरांनी माझ्या ऑफिसमध्ये बाहेरचा दरवाजा तोडून प्रवेश केला होता. आतमध्ये आल्यावर त्यांनी अकाउंट्स विभागातून आमची तिजोरी ( कदाचित हे चोर ती तिजोरी तोडू शकले नाहीत ) आणि एक बॉक्स चोरून नेला आहे. या बॉक्समध्ये आमच्या कंपनीने निर्मिती केलेल्या एका चित्रपटासंदर्भात काही गोष्टी होत्या. आमच्या कार्यालयाकडून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच लवकरात लवकरच या चोरट्यांना पकडलं जाईल असं आश्वासन पोलिसांनी आम्हाला दिलं आहे. कारण, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे दोन्ही चोर एका रिक्षात सामान ठेवत असल्याचं दृष्टीस पडत आहे. देव त्यांना सद्बुद्धी देवो…हा व्हिडीओ आमच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी काढला होता.”

हेही वाचा : Bigg Boss OTT 3 : भव्य आरसा, प्रशस्त स्वयंपाकघर, बेडरूम अन्…; ‘बिग बॉस’च्या घराचे Inside फोटो आले समोर

दरम्यान, अनुपम खेर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. गेल्या ४० वर्षांपासून ते बॉलीवूडमध्ये काम करत आहेत. १९८४ मध्ये आलेला ‘सारांश’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. येत्या काळात ते ‘मेट्रो इन दिन’, ‘फतेह सिंग’, ‘अलर्ट 24*7’ या चित्रपटांमध्ये ते झळकणार आहेत.