तुम्हाला अभिनेता हरमन बावेजा आठवतोय का? प्रेक्षक हरमनला अभिनेता म्हणून कमी आणि हृतिकसारखा दिसणारा हिरो म्हणून अधिक ओळखतात. हरमनने ‘लव्ह स्टोरी २०५०’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात त्याच्यासोबत प्रियांका चोप्राही होती. खरं तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. मात्र प्रियांका आणि त्याची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर हरमनने याविषयीचं मौन सोडलं असून ब्रेकअपमागचं कारण सांगितलं.

हेही वाचा- शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटगृहांमध्ये दाखवणे का शक्य नाही? निर्मात्यांनी सांगितले कारण, म्हणाले…

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
baramati lok sabha seat, supriya sule, pawar surname, jitendra awhad, sharad pawar, ajit pawar, jitendra avhad criticise ajitdada, pawar surname, sunetra pawar, thane, bjp,
जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुप्रिया सुळेंना राजकीय फायदा घ्यायचा असता तर…
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

एका मुलाखतीमध्ये हरमनने प्रियांका आणि त्याच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. “त्या वेळी माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होते त्यामुळे माझ्यावर प्रचंड ताण येत होता त्यामुळे मला माझं सारं लक्ष चित्रपटांवर केंद्रित करायचं होतं. या साऱ्या गडबडीमध्ये मला प्रियांकालादेखील वेळ देण्यास जमत नव्हतं,” असं हरमनने सांगितलं.

हेही वाचा- प्रसूतीनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने १० दिवसात घटवलं १० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

पुढे हरमन म्हणला, “लव्ह स्टोरी २०५०’ अपयशी ठरल्यानंतर मला ‘वॉट्स यूआर राशी’ या चित्रपटाकडे विशेष लक्ष द्यायचं होतं. या चित्रपटात माझी महत्त्वाची भूमिका होती. त्यातच चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही मला चित्रपटावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं होतं. प्रियांका मला त्या वेळी सतत वेळ देण्यास सांगत होती. मात्र मला त्या वेळी ते शक्य नव्हतं. त्यामुळेच आमच्या नात्यात दुरावा आला. . खरं तर आशु सर (आशुतोष गोवारीकर) मला सांगायचे, ‘कोणत्याही व्यक्तीला त्याची स्पेस द्यावी.’ पण मी असं काही केलं नाही. मी सर्व मर्यादा ओलांडल्या, असं हरमन म्हणाला.

हेही वाचा- “जर चित्रपट प्रेक्षकांचं मन दुखावत असेल तर…”; ‘द केरला स्टोरी’वरून सुरू असलेल्या वादावर नवाजुद्दिन सिद्दिकीचं वक्तव्य, म्हणाला…

हरमनने ‘व्हॉट्स युवर राशी’ आणि ‘व्हिक्ट्री’सारखे सिनेमे केले. पण हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले होते. त्यामुळे त्याचं सिनेकरिअर हे तीन सिनेमांपूरतच मर्यादित राहीलं. त्यानंतर हर्मन फारसा कुठेच दिसला नाही. २०१४ मध्ये त्याने ‘ढिश्कियाव’ या सिनेमातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण हा सिनेमाही फार चालला नव्हता.