करण सिंग ग्रोव्हर लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे, त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. करण त्याच्या अभिनयापेक्षा जास्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. दोनवेळा घटस्फोट झाल्यानंतर करणने बिपाशा बासूशी लग्न केलं. आता इतक्या वर्षांत पहिल्यांदाच करणने जेनिफर विंगेट आणि श्रद्धा निगम यांच्यासोबतच्या अपयशी लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. जे झालं ते चांगल्यासाठी झालं असं करण म्हणाला.

जेव्हा करणला त्याच्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना करणला घटस्फोटाबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, “ब्रेकअप किंवा घटस्फोट यात काहीही चांगलं नाही. जे झालं ते चांगल्यासाठी झालं असं समजून लोक आयुष्यात पुढे जातात.”

“चुकीच्या पद्धतीने स्पर्श…”, ‘खल्लास गर्ल’चा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “ए-लिस्ट बॉलीवूड अभिनेत्याने मला एकटं…”

बिपाशाशी लग्न करण्याआधी झालेल्या दोन घटस्फोटांबाबत करण पहिल्यांदाच बोलला आहे. त्याच्या आयुष्यात काय घडत आहे त्याबद्दल त्याला कोणालाही सांगण्याची गरज वाटली नाही, असं करणने सांगितलं. “लोकांनी येऊन मला त्यांच्या आयुष्यातील अनुभव सांगावे, हा माझा मुख्य हेतू नाही. मला प्रेम आणि आनंद पसरवायचा आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्या गोष्टी हाताळण्यासाठी प्रत्येकाला प्रायव्हसी मिळायलाच हवी,” असं करण म्हणाला.

‘मिर्झापूर’ मधील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री रसिका दुग्गल म्हणाली, “रिहर्सलच्या वेळीच मला जाणवलं की…”

बिपाशाशी लग्न आणि मुलगी देवीचा जन्म याबाबत करण म्हणाला की या नात्यांनी त्याला खूप बदललं आहे. “तिच्यामुळे आज मी स्वतःला ओळखतो. माझ्यात जो बदल झाला आहे तो खूप मोठा आहे. आयुष्यात चांगले बदल झाले आहेत. लग्नाआधी मी रात्री जागायचो आणि सकाळी उशीरा उठायचो, पण मी आता पहाटे ५ वाजता उठतो. मला प्रत्येक सूर्योदय आणि प्रत्येक सूर्यास्त पाहण्याची इच्छा असते,” असं करण म्हणाला.

Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

करण आणि बिपाशा २०१५ मध्ये ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि प्रेमात पडले. या जोडप्याने ३० एप्रिल २०१६ रोजी लग्न केलं, त्यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. त्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांची मुलगी देवी हिचं स्वागत केलं. बिपाशाशी लग्न करण्यापूर्वी करण सिंग ग्रोव्हरने दोन लग्न केली होती आणि दोन्ही वेळा घटस्फोट झाला. करणने २००८ मध्ये अभिनेत्री श्रद्धा निगमशी लग्न केलं पण वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तो ‘दिल मिल गये’च्या सेटवर अभिनेत्री जेनिफर विंगेटला भेटला. दोघांची मैत्री झाली आणि मग ते डेटिंग करू लागले. त्यांनी २०१२ मध्ये लग्न केलं, पण त्यांचं लग्न वर्षभरही टिकू शकलं नाही. लग्नाच्या अवघ्या १० महिन्यांनंतर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला, ते २०१४ मध्ये कायदेशीररित्या विभक्त झाले.