शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला शाहरुख प्रेमी गर्दी करत आहेत. चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच दमदार कमाई केली आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचे हाऊसफुल्ल शोज सुरु आहेत. शाहरुखचे चाहते चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे कौतुक करत आहेत. अशातच अभिनेता केआरकेने चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान कायमच चर्चेत असतो. पठाण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याने चित्रपटावर टीका केली होती मात्र आता त्याचे सूर बदलले आहेत. मध्यंतरापर्यंत चित्रपट कसा आहे यावर त्याने भाष्य केलं आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहलं आहे, “मध्यंतरापर्यंत चित्रपट पाहिला आहे आणि आत्तापर्यंतचा ‘पठाण’ जबरदस्त आहे. चित्रपट खूपच मनोरंजन करणारा आहे.” चित्रपटाच्या विरोधात सतत ट्वीट करणार्या केआरकेला अचानक चित्रपटाचे कौतुक करताना पाहून नेटकरीदेखील आश्चर्यचकित झाले आहेत.
केआरकेच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहले, ‘हा एक चमत्कार झाला आहे’, तर दुसऱ्याने लिहले आहे, “तुझं अकाउंट कोणी हाक नाही ना केलं?” एकाने लिहले आहे “KRK ला चांगला रिव्ह्यू करायला शाहरुख खानने भाग पाडले आहे.”
It’s interval and till here #Pathaan@iamsrk is on fire. It’s brilliant and full of entertainment. 4* for first half.
‘पठाण’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पाहता यावा यासाठी ८ लाखांपेक्षा अधिक तिकिटं बुक करण्यात आली आहेत. याबाबतीत ‘पठाण’ने ‘बाहुबली २’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानची झलक पाहायला मिळाली आहे.