scorecardresearch

“आधी गरोदर मग लग्न बॉलिवूडमध्ये…” प्रसिद्ध अभिनेत्याने कियारा अडवाणी -सिद्धार्थ मल्होत्राला लगावला अप्रत्यक्ष टोला

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला.

ranbir alia sid kiara
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये कलाकार मंडळी विवाह बंधनात अडकत आहेत. नुकतंच कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. हे नव दाम्पत्य नुकतेच मुंबईत परतले तेव्हा विमानतळावर कियाराने परिधान केलेल्या ब्लॅक ट्राऊजर आणि काळ्या रंगाची शाल अंगावर घेतली, ती ज्या पद्धतीने घेतली होती त्याच्यावरून लोकांनी अंदाज लावला की कियारा गरोदर आहे असे अनेकांना वाटले. यावरच आता प्रसिद्ध अभिनेता निर्माता केआरकेने ट्वीट केलं आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा सतत चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचं तो समीक्षण करत असतो. तसेच कलाकारांवर तो भाष्य करत असतो. नुकतंच त्याने ट्वीट केलं आहे, तो असं म्हणाला, “बॉलिवूडमध्ये सध्या एक ट्रेंड सुरु आहे तो म्हणजे पहिले गरोदर होतात मग लग्न करतात. सूत्रांच्या माहितीनुसार बॉलिवूडमध्ये जे नुकतेच लग्न झाले आहे तेदेखील याच पद्धतीने झाले आहे. चांगलं आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

‘फर्जी’मधली शाहिद कपूरची गर्लफ्रेंड खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; फोटो पाहिलेत का?

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा सतत चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचं तो समीक्षण करत असतो. तसेच कलाकारांवर तो भाष्य करत असतो. नुकतंच त्याने ट्वीट केलं आहे, तो असं म्हणाला बॉलिवूडमध्ये सध्या एक ट्रेंड सुरु आहे तो म्हणजे पहिले गरोदर होतात मग लग्न करतात. सूत्रांच्या माहितीनुसार बॉलिवूडमध्ये जे नुकतेच लग्न झाले आहे तेदेखील याच पद्धतीने झाले आहे. चांगलं आहे. अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

केआरकेने अभिनेत्री रवीना टंडनवरदेखील टीका केली आहे. वीनाला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराबाबत त्याने एक ट्वीट केलं आहे. त्याने लिहिलं, “रवीना टंडन हिला यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार मिळणार आहे, जिने ‘टिप टिप बरसा पानी’ सारखं गाणं केलं आहे. पद्मभूषण पुरस्कार म्हणजे गंमत आहे का?” अशी टीका त्याने केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 13:20 IST