दीपिका पादुकोणने रणवीर सिंहशी लग्न करण्यापूर्वी रणबीर कपूर, मुझम्मिल इब्राहिमसह इतर काही जणांना डेट केलं होतं. दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड मुझम्मिलने एका मुलाखतीत त्यांच्या डेटिंगच्या आठवणी सांगितल्या होत्या. तसेच दीपिकाबरोबर २ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो, असंही त्याने म्हटलं होतं.

मुझम्मिल ‘धोखा’, ‘विल यू मॅरी मी?’ ‘हॉर्न ओके प्लीज,’ ‘धीमे धीमे’ या चित्रपटांसाठी ओळखला जातो. दीपिका पादुकोणने मुंबईत आल्यावर मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याच काळात मुझम्मिल म्युझिक व्हिडीओ व मॉडेलिंग करत होता.

सिद्धार्थ कन्ननशी बोलताना मुझम्मिल म्हणाला, “आम्ही दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो.” मुंबईत दीपिकाला भेटलेला मुझम्मिल पहिलाच मुलगा होता. त्या काळात दीपिका कशी होती, असं विचारल्यावर तो म्हणाला, “तिला खूप आत्मविश्वास होता, कारण ती प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे, त्यामुळे सर्वांना तिच्याबद्दल माहीत होतं.”

Award Banner

तेव्हा मी स्टार होतो – मुझम्मिल

“मी त्यावेळी स्टार होतो, ती नव्हती. आता ती सुपरस्टार आहे. तिला सगळे ओळखतात, मला कोणीही ओळखत नाही. मी तिचा खूप मोठा चाहता आहे. मला तिचे चित्रपट पाहायला आवडतात. ती एक अत्यंत सुंदर स्त्री आहे. ती खूप छान काम करतेय,” असं मुझम्मिल दीपिकाबद्दल म्हणाला. मुझम्मिल व दीपिका अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत का? असं विचारल्यावर त्याने नकार दिला. “तिचे लग्न होण्यापूर्वी आम्ही कधीकधी बोलायचो,” असं त्याने सांगितलं.

मुझम्मिलने सांगितल्या दीपिकाबरोबरच्या आठवणी

“तेव्हा आम्ही लहान होतो. आम्ही पावसाळ्यात रिक्षाने डेटवर जायचो. ते क्षण खूप गोड होते. तेव्हा माझ्याकडे तिच्यापेक्षा जास्त पैसे होते, कारण मी चांगलं कमवू लागलो होतो. नंतर मी एक कार विकत घेतली, त्यावेळी तिला खूप आनंद झाला होता. या सगळ्या चांगल्या आठवणी आहेत, कारण तेव्हापासून मी रिक्षाने डेटवर गेलो नाही आणि आमच्याकडे पैसे नसतानाही आम्ही खूप आनंदी होतो,” अशी आठवण मुझम्मिलने सांगितली.

मुझम्मिल दीपिकाच्या वाढदिवसासाठी पैसे नसतानाही तिची आवडती गाणी वाजवून घ्यायचा. “पैसे नसतानाही, डीजे तिला आवडणारं गाणं वाजवत असे, कारण मी त्यांच्याशी मैत्री करायचो. तिच्या वाढदिवसाला डीजे दीड तास तिची आवडती गाणी वाजवायचा,” असं मुझम्मिल इब्राहिम म्हणाला. तसेच २ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आपणच दीपिका पादुकोणबरोबर ब्रेकअप केलं, असा दावा मुझम्मिलने केला होता.