शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तब्बल ४ वर्षांनी तो मोठया पडद्यावर झळकला आहे. ‘पठाण’ चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत. दिवसेंदिवस हा चित्रपट नवनवे विक्रम करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बराच वाद झाला होता. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची जोरदार मागणी झाली होती मात्र त्याचा परिणाम झाला नाही. यावरच अभिनेते प्रकाश राज यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध अभिनेते प्रकाशराज सोशल मीडियावर सक्रीय असतात. सामाजिक मुद्दे, विशेष करून मोदी सरकारवर ते कायमच टीका करत असतात. याआधी त्यांनी शाहरुखचे कौतुक केले होते. मात्र पुन्हा एकदा त्यांनी ट्वीट करत बॉयकॉट करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ते असं म्हणाले, “त्यांना पठाणवर बंदी आणायची होती. तो चित्रपट ७०० कोटींच्या पुढे गेला आहे. पठाणवर बंदी घालणारे या मूर्ख लोकांनी मोदींच्या चित्रपटाला ३० कोटींचा व्यवसाय करेपर्यंत नेऊ शकले नाहीत. ते फक्त भुंकत आहेत, ते चावत नाहीत. काळजी करू नका”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. केरळमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“मला पटलं नाही तर…” अभिनयाच्याबाबतीत ओंकार भोजनेचे स्पष्टीकरण

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील दमदार कमाई अजूनही सुरू आहे. चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून त्याने अनेक विक्रम मोडले आहेत. आता तो हिंदी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे. सोमवारच्या कमाईनंतर त्याने यशच्या KGF: Chapter 2 ला मागे टाकलंय, असं दिसत आहे. देशांतर्गत या चित्रपटाने जवळपास ४३८.५ कोटी रुपये कमावले आहेत. तर, जगभरात या चित्रपटाने ११४८ कोटी रुपये कमावले होते.

‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानची झलक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor prakash raj comapres boycott gang over pathaan film with dog he said they can not run modis biopic spg
First published on: 07-02-2023 at 12:53 IST