‘द काश्मीर फाइल्स’ हा २०२२ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित हा चित्रपट होता. हा चित्रपट ऑस्करमध्ये शॉर्टलिस्ट झाला आहे असा दावा चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केला होता. यावरून त्यांना बरेच ट्रोल केले गेले. अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा या चित्रपटावर टीका केली आहे.

प्रसिद्ध अभिनेते प्रकाशराज सोशल मीडियावर सक्रीय असतात. सामाजिक मुद्दे, विशेष करून मोदी सरकारवर ते कायमच टीका करत असतात. याआधी त्यांनी शाहरुखचे कौतुक केले होते. आता त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका केली आहे. केरळमधील एका कार्यक्रमात ते असं म्हणाले, “काश्मीर फाइल्स हा एक वाईट चित्रपट आहे, पण त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्यांच्यावर थुंकतात आणि चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणतो मला ऑस्कर का मिळत नाही? ऑस्कर काय त्याला भास्करही मिळणार नाही. कारण बाहेर संवदेनशील माध्यम आहेत इथे तुम्ही प्रपोगंडा चित्रपट बनवू शकता. माझ्या सूत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट बनवण्यासाठी २०० कोटी खर्च केले आहेत.”

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

ती सर्वात खोटारडी…” अक्षय कुमारबरोबरच्या अफेअरआधी अजय देवगणने रवीना टंडनवर केले होते गंभीर आरोप

दरम्यान, ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. हा प्रोपगंडा चित्रपट असल्याची टीकाही झाली होती.

सध्या विवेक अग्निहोत्री त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटावर काम करत आहेत. हा विषय करोना काळातील लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.