भारतीय सिनेसृष्टीतील एक बहुआयामी अभिनेता म्हणजे आर माधवन. आज त्याचा वाढदिवस आहे. तो आज ५३ वर्षांचा झाला.  तो त्याच्या कामबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या मुलाबद्दल, पत्नीबद्दल त्याला वाटणाऱ्या भावना आणि अभिमान तो नेहमीच व्यक्त करत आला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की आर. माधवनने त्याच्या विद्यार्थिनीशीच लग्न केलं आहे? होय. आणि त्याची आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी खूप फिल्मी आहे.

आर माधवनच्या पत्नीचं नाव सरिता बिरजे आहे. त्यांची ओळख कोल्हापूरमध्ये झाली. त्याने मुंबईच्या केसी कॉलेजमधून पब्लिक स्पीकिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्याने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेतलं. जवळपास पाच वर्षे तो कोल्हापुरात होता. आधी राजाराम हॉस्टेल आणि नंतर राजारामपुरीत तो भाड्याच्या खोलीत राहायचा. मराठमोळं जेवण, अभ्यासासाठी शिवाजी विद्यापीठाची लायब्ररी असा त्याचा कोल्हापूर प्रवास आहे. कोल्हापुरात शिक्षण पूर्ण केल्यावर तो तिथेच शिक्षक म्हणून काम करू लागला.

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

आणखी वाचा : ‘रॉकेट्री’ चित्रपटाची निर्मिती करताना आर माधवनने गमावले आपले घर? अभिनेत्याने केला खुलासा

कोल्हापूरमध्ये त्याने पब्लिक स्पीकिंगचे क्लासेस सुरू केले. या दरम्यान त्याने कोहलापूरमध्ये एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेत त्याला सरिता बिर्जे पहिल्यांदा भेटली. सरिताला एअरहोस्टेस व्हायचं होतं, तिने १९९१ मध्ये माधवनचा पर्सनेलिटी डेवलेपमेंट क्लास लावला आणि ती मुलाखतीतही उत्तीर्णही झाली. तेव्हा एकदा तिने आर माधवनला थँक्स डिनरसाठी तिच्या घरी बोलावलं होतं आणि इथूनच त्या दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली.

हेही वाचा : आर. माधवनने रचला नवा विक्रम, सलमान खान, शाहरुख खान यांनाही टाकले मागे

या एका डिनरने त्या दोघंचं आयुष्य बदललं. तेव्हा त्यांच्यातलं बॉंडिंग वाढत गेलं आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर आठ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर १९९९ मध्ये त्यांनी लग्न केलं. जेव्हा दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती तेव्हा आर माधवनने सिनेसृष्टीत कोणतंही नाव कामावलं नव्हतं, तो स्टार नव्हता. पण २००१ मध्ये माधवनने ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि लोकप्रियता मिळवली.