R Madhavan rents out luxury apartment in Mumbai’s BKC : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आर. माधवन आणि त्याच्या पत्नीने मुंबईतील त्यांचे एक अपार्टमेंट भाड्याने दिले आहे, ज्याचे मासिक भाडे ६.५० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या वृत्तानुसार, मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, अभिनेता आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील त्यांचे निवासी अपार्टमेंट भाड्याने दिले आहे.

मुबंईतील अपार्टमेंट दिले भाड्याने

जून २०२५ मध्ये भाडेपट्टा आणि परवाना करार अधिकृतपणे नोंदणीकृत झाला. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) हा मुंबईतील एक अतिशय पॉश परिसर आणि व्यावसायिक केंद्र आहे. या ठिकाणी अनेक मोठ्या वित्तीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यालय आणि व्यावसायिक दूतावास आहे, त्यामुळे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मालमत्तेच्या किमती आणि भाडे दोन्ही खूप जास्त आहेत. आर. माधवन आणि त्याच्या पत्नीने जुलै २०२४ मध्ये १७.५० कोटी रुपयांना हे ३८८.५५ चौरस मीटर (४,१८२ चौरस फूट) अपार्टमेंट खरेदी केले होते.

स्क्वेअर यार्ड्सना मिळालेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, आर. माधवन आणि त्यांची पत्नी सरिताने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘सिग्निया पर्ल’ येथे एक अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. भाडे करारात ३९ लाख रुपयांची सुरक्षा ठेव समाविष्ट आहे आणि त्याची नोंदणी ४७,००० रुपये स्टॅम्प ड्युटी आणि १,००० रुपये नोंदणी शुल्कासह करण्यात आली आहे.

स्क्वेअर यार्ड्सच्या मते, या मालमत्ता कराराचा भाडेपट्टा कालावधी २४ महिने (२ वर्षे) आहे, जो जून २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे आणि १६ महिन्यांचा लॉक-इन कालावधी असेल. मासिक भाडे पहिल्या वर्षी ६.५० लाख रुपयांपासून सुरू होते आणि दुसऱ्या वर्षी ५% वाढून सुमारे ६.८३ लाख रुपये होईल. अशा प्रकारे या संपूर्ण कालावधीत मिळालेले एकूण भाडे सुमारे १.६० कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.

आर. माधवनने त्याच्या कारकिर्दीत हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमधील अनेक उत्तम चित्रपट केले आहेत, पण अजूनही ‘रहना है तेरे दिल में’साठी त्याला ओळखले जाते.

पहिल्यांदाच अभिनेता आर. माधवन आणि फातिमा सना शेख रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघेही ‘आप जैसा कोई’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट ११ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.