"सकाळी कुठे होता भावा…" प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्याने सलमान खान ट्रोल | actor salman khan wish Republic Day to fans get troll after tweet nrp 97 | Loksatta

“सकाळी कुठे होता भावा…” प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्याने सलमान खान ट्रोल

सलमानने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे.

salman khan
सलमान खान

भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यानिमित्ताने अभिनेता सलमान खानने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्यामुळे तो ट्रोल झाला.

सलमान खान हा कायमच विविध गोष्टींबद्दल पोस्ट शेअर करत असतो. नुकतंच सलमानने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये तो म्हणाला, “प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा… जय हिंद!” सलमानने हे ट्वीट संध्याकाळी ५.१६ च्या दरम्यान केलं आणि त्यामुळे तो ट्रोल झाला.
आणखी वाचा : Video : दमदार अ‍ॅक्शन, रोमान्स अन् सलमानचा खास लूक; ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर प्रदर्शित

सलमानने हे ट्वीट केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. ‘सकाळी कुठे होता भावा…. जय हिंद, लेट’, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे.

तर एकाने ‘भावा इतक्या लवकर’ असे म्हटले आहे. तर एकाने म्हटले की ‘भाईजानची सकाळ आता झाली आहे, जय हिंद.’

तर एकाने ‘खूप लवकर आठवण आली’, असे म्हटले आहे.

आणखी वाचा : “मला सांगायला आवडेल की…” कियाराशी लग्न करण्याबद्दल सिद्धार्थ मल्होत्राने सोडलं मौन

दरम्यान अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपटादरम्यान सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची झलक दाखण्यात आली. त्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. तर सलमान खान हा स्वत: या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे, दग्गुबती व्यंकटेश, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, जस्सी गिल आणि पलक तिवारी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यात दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२३ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 19:14 IST
Next Story
“शाहरुख हा धर्मनिरपेक्ष…” जावेद अख्तर यांनी किंग खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत