Premium

‘जवान’मध्ये कमी स्क्रीन टाईम मिळाल्यामुळे नयनतारा नाराज, प्रतिक्रिया देत शाहरुख खान म्हणाला…

या चित्रपटात तिचे सीन्स कट केल्यामुळे ती नाराज झाली आहे. आता यावर शाहरुख खानने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

nayanthara srk

शाहरुख खानचा ‘जवान’ हा बहुचर्चित चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत झळकली. पण या चित्रपटात तिचे सीन्स कट केल्यामुळे ती नाराज झाली आहे. आता यावर शाहरुख खानने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते खूप गर्दी करत आहेत. या चित्रपटातील ॲक्शन, कलाकारांची कामं, गाणी, कथा, संवाद या सर्वांनाच खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आता अशातच नुकतीच अभिनेत्री नयनतारा हिने ते बॉलीवूडमध्ये कधीही काम करणार नाही असं म्हणत या चित्रपटातील तिचे सीन्स कट केल्याबद्दल दिग्दर्शक ॲटलीवर नाराजी व्यक्त केली. तर आता यावर शाहरुख खानने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ओटीटीवर शाहरुख खान व नयनताराचा ‘हा’ अंदाज येणार समोर? ‘जवान’मधून डिलीट केलेले सीन्स लीक

शाहरुख खानने नुकताच त्याच्या ट्विटर अकाउंटवरून चाहत्यांशी आस्क एसआरके (AskSRK) सेशनद्वारे संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्याने नयनताराने साकारलेल्या सिंगल मदरचा प्रवास चित्रपटात आणखीन दाखवायला हवा होता असं म्हटलं. त्यावर उत्तर देत शाहरुखने लिहिलं, “सिंगल मदर म्हणून नर्मदाची दाखवलेली गोष्ट ही खूप सुंदर आहे. दुर्दैवाने काही कारणामुळे तिला जास्त स्क्रीन टाईम मिळाला नाही. पण तिची गोष्ट खूप छान होती.”

हेही वाचा : “शाहरुख खान आणि ॲटली यांनी जबरदस्तीने…”, ‘जवान’मधील कलाकाराचा मोठा खुलासा

दरम्यान जवान या चित्रपटाने जगभरातून ७०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून यामध्ये शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, विजय सेतुपती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor shahrukh khan gave his reaction on less screen time to nayanthara in jawan film rnv

First published on: 23-09-2023 at 12:10 IST
Next Story
राघव-परिणीतीच्या लग्नात पाहुण्यांसाठी कडक नियमावली, पाळाव्या लागणार ‘या’ अटी