आधी बॉलिवूड आणि आता हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. नुकतंच तिने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केल्याने ती चर्चेत आली. या राजकारणाला कंटाळूनच तिने हा निर्णय घेतल्याचं तिने डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोमध्ये खुलासा केला. यावर बऱ्याच कलाकारांनी प्रतिक्रिया दिली. अशातच आता अभिनेते शेखर सुमन यांनी भाष्य केलं आहे.

शेखर सुमन बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते असून गेली काही वर्ष ते विनोदी कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून दिसून येतात. ते ट्वीटरवर सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी ट्वीट केलं आहे ज्यात ते असं म्हणाले, “प्रियांकाने केलेले वक्तव्य मला धक्कादायक वाटले नाही. इंडस्ट्रीमध्ये गुप्त कारस्थान एक प्रसिद्ध गट आहे. तो गट तुमच्यावर अत्याचार, छळ आणि तुम्हाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो जोपर्यत तुम्ही संपत नाही.. हे सुशांत सिंह राजपूतबाबत घडले आहे.

how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?

शेखर यांनी आणखीन एक ट्वीट केलं ज्यात ते असं म्हणाले, “मला इंडस्ट्रीतील किमान ४ लोक माहिती आहेत ज्यांनी मला आणि अध्ययनला अनेक प्रोजेक्ट्समधून काढून टाकले आहे. मला हे नक्की माहित आहे. या ‘गुंड’ लोकांचा खूप प्रभाव आहे आणि ते सापापेक्षा जास्त धोकादायक आहेत. पण सत्य हे आहे की ते अडथळे निर्माण करू शकतात मात्र आपल्याला रोखू शकत नाही.” अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाली होती प्रियांका चोप्रा :

प्रियांका चोप्राने अलीकडेच डॅक्स शेफर्डसोबत ‘आर्मचेअर एक्सपर्ट’ या पॉडकास्टमध्ये बॉलिवूड सोडण्याविषयी बोलले. प्रियांका म्हणाली होती की, मला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. मला चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता.”

“मला म्युझिकने जगाच्या दुसऱ्या भागात जाण्याची संधी दिली. जे चित्रपट मला करायचे नव्हते, ते करण्याची मला आवडही नव्हती. पण, मला क्लब आणि लोकांच्या काही गटांना चांगल्या कामासाठी आकर्षित करावं लागायचं, त्यासाठी मेहनत करावी लागायची, तेव्हापर्यंत मी खूप काम केलं. पण म्युझिकची ऑफर आल्यावर मी म्हणाले की खड्ड्यात जा, मी तर अमेरिकेला निघाले.