“मला सांगायला आवडेल की…” कियाराशी लग्न करण्याबद्दल सिद्धार्थ मल्होत्राने सोडलं मौन

या मुलाखतीत त्याने त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केले.

Sidharth Malhotra kiara advani
सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणी

गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे दोघेही विवाहबंधनात अडकले. त्यानंतर आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच एका मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्राने याबद्दल मत व्यक्त केलं.

सिद्धार्थ मल्होत्रा हा सध्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो ​​एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याबरोबर तो रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या सिरीजमध्येही झळकणार आहे. यानिमित्ताने त्याने ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “मी मेल्यानंतर…” पापाराझींना पाहताच ढसाढसा रडली राखी सावंत, नेमकं काय घडलं?

‘येत्या ८ फेब्रुवारीला तू आणि कियारा लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे, हे खरं आहे का?’ असं त्याला विचारले असता तो म्हणाला, “गेल्यावर्षीही माझ्या लग्नाबद्दल अनेक चर्चा सुरु होत्या. यंदाही माझ्या लग्नाबद्दल चर्चा सुरु आहेत. विविध तारखाही समोर आल्या आहेत. पण जेव्हा लोक इतक्या आत्मविश्वासाने तारखा सांगतात तेव्हा खरंतर मला आश्चर्य वाटते.”

“पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की, मी सध्या अशा प्रोफेशनमध्ये आहे, जिकडे कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही. विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही लग्न करता त्यात लपवण्यासारखे काहीही नसते. त्यामुळे मी जेव्हा लग्न करेन तेव्हा तुम्हाला त्याबद्दल नक्कीच सांगेन”, असे सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला.

दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आणि कियाराच्या नात्याबद्दल मौन बाळगताना दिसतो. तर, कियारा अडवाणीने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये ती आणि सिद्धार्थ एकमेकांचे फक्त मित्र नसून त्यापेक्षा जास्त आहेत, असं म्हटलं होतं. सिद्धार्थ आणि कियाराने ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर आता येत्या ८ फेब्रुवारीला ते दोघेही लग्न करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 14:52 IST
Next Story
Video : शाहरुख खानच्या चाहत्यांचा कहर; ‘पठाण’ हेअरकट करत व्यक्त केलं प्रेम, ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहाच
Exit mobile version