काही अभिनेते आपल्या अभिनयासाठी, तर काहीजण स्टाईलसाठी ओळखले जातात. अभिनेता सोनू सूद त्याच्या अभिनयापेक्षा आता सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. संपूर्ण करोना काळात त्यानं ज्याप्रकारे देशभरातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली त्याचं सर्वत्र कौतुक झालं आहे. सोनूने त्याकाळात स्वखर्चाने लाखो कामगारांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवले. त्याच्या या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक झाले. सोनूने नुकताच लोकलने प्रवास केला होता. त्याच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी कौतूक केले होते. त्याचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोनु सूद आपल्या ट्विटर अकाऊंटवर सक्रिय असतो. आपल्या कामाबद्दलची माहिती तो ट्विटर टाकत असतो, नुकताच त्याने एका वॉचमनबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. गाडीतून जात असताना त्याने वॉचमनला जेवण बनवताना बघितले आणि तो गाडीतून उतरला आणि वॉचमनला मदत करू लागला. वॉचमन तव्यावर भाजत होता मी करतो, आणि असं म्हणत रस्त्यावर पोळी भाजू लागला. तो व्हिडिओमध्ये म्हणाला ‘येथे भाजलेली पोळी जगातील कोणतेही पंचतारांकित हॉटेल देऊ शकत नाही’.

रश्मिका मंदानाला चोरायची आहे आलियाची ‘ही’ वस्तू; म्हणाली, “मी तिचा…”

अवघ्या १ मिनिट २० सेकंदाच्या या व्हिडीओने त्याच्या चाहत्यांची तसेच देशातील लोकांची मने जिंकली आहेत. अनेकांनी अभिनेत्याच्या या स्वभावाचे कौतुक केले, तर काही जण याला पब्लिसिटी स्टंट असेही म्हणत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, या अभिनेत्याला आता चर्चेत राहण्याचे व्यसन लागले आहे, त्यामुळे तो हे सर्व करत राहतो. याशिवाय त्याचे चाहते त्याच्या या व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहेत.

सोनू नुकताच ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात दिसला होता. सोनू सूद मूळचा पंजाबी असून त्याने आपले शिक्षण नागपूर येथून केले आहे. तामिळ चित्रपटातून त्याने अभिनय करण्यास सुरवात केली. ‘जोधा अकबर’, ‘युवा’, ‘आशिक बनाया आपने, यांसारख्या हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे.