हृदयविकाराचा झटका आला असल्याच्या अफवांवर अखेर उदित नारायण यांनी सोडलं मौन, म्हणाले, "खूप त्रास..." | actor udit narayan talk about viral reports of heart attack says i am fine singer health update see details | Loksatta

हृदयविकाराचा झटका आला असल्याच्या अफवांवर अखेर उदित नारायण यांनी सोडलं मौन, म्हणाले, “खूप त्रास…”

सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा होत होती. आता यावर उदित नारायण यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

हृदयविकाराचा झटका आला असल्याच्या अफवांवर अखेर उदित नारायण यांनी सोडलं मौन, म्हणाले, “खूप त्रास…”
सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा होत होती. आता यावर उदित नारायण यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ही अफवा ऐकताच उदित नारायण यांचे चाहतेही चिंतेत पडले होते. पण त्यांनी प्रकृती खरंच बिघडली का? असा प्रश्न निर्माण झाला होता. सतत होणाऱ्या या चर्चांबाबत उदित नारायण यांच्या मॅनेजरने स्पष्टीकरण दिलं. त्यांना हृदय विकाराचा झटका आला नसल्याचंही मॅनेजरने सांगितलं. आता स्वतः उदित नारायण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले उदित नारायण?
‘आजतक’शी उदित नारायण यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “दसऱ्याच्यानिमित्त माझ्या प्रकृतीबाबत अशा प्रकारची अफवा पसरवण्यात आली. यामुळे माझं आयुष्य आणखीनच वाढलं. जी व्यक्ती इतकी हसते त्याला हृदय विकाराचा झटका कसा येऊ शकतो? ही अफवा का? आणि कोणी? पसरवली असेल.”

ते पुढे म्हणाले, “माझी प्रकृती कशी आहे हे विचारण्यासाठीही मला अनेक फोन येत होते. मी माझ्या फॅमिली ग्रुपवरदेखील माझा आताचा व्हिडीओ शेअर करत ठिक असल्याचं नातेवाईकांना सांगितलं. अशाप्रकारच्या अफवांचा माझ्यावर कोणताच परिणाम होत नाही. पण माझ्या कुटुंबातील मंडळींना यामुळे त्रास झाला.” उदित नारायण आणि त्यांच्या कुटुंबियांना या अफवांमुळे खूप त्रास सहन करावा लागला.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

उदित नारायण यांची तब्येत ठीक आहे. त्यांना काहीही झालेलं नाही. ट्विटरवर अशा प्रकारचे मेसेज आणि वृत्त व्हायरल झाल्यानंतर आपलं त्यांच्याशी बोलणं झालं असून तेसुद्धा या अशा वृत्तांमुळे त्रासले आहेत असं उदित नारायण यांच्या मॅनेजरने सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा या चर्चा खोट्या असल्याचं उदित नारायण यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विकी कौशल व शाहरुख खानचा ‘अशोका’ चित्रपटाच्या सेटवरील जुना फोटो व्हायरल, चाहते म्हणाले “या मुलाचं कतरिना…”

संबंधित बातम्या

१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री
अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी अजय देवगण उत्सुक, ट्वीट करत म्हणाला…
अखेर ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम; ‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार दिसणार की नाही याचा झाला खुलासा
“दबंग’च्या प्रदर्शनानंतर अरबाज…” मलायकाने सांगितलं घटस्फोट होण्यामागचं खरं कारण
Video : अभिनेत्री बनण्यापूर्वी अशी दिसायची प्रियांका चोप्रा, व्हिडीओ पाहून ओळखणंही झालं कठीण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
दिव्या अग्रवालच्या साखरपुड्यानंतर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
Video: लग्नात बुरखा घातलेल्या ‘ती’ ने सर्वांसमोर नवरदेवाला जवळ खेचंल; त्यानंतर त्याने महिलेचा चेहरा पाहिला अन…
ठरलं! टीम इंडियाला मिळाला नवीन प्रशिक्षक; राहुल द्रविडच्या निकटवर्तीयाची BCCI कडून निवड
मलायका अरोरानेच केलं होतं अरबाज खानला लग्नासाठी प्रपोज, स्वत:च केला खुलासा, म्हणाली…
विश्लेषण: आंतरराष्ट्रीय तस्करांकडून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नव्या मार्गाचा वापर; तालिबान्यांचा मोठा हातभार, वाचा सविस्तर!