गेले दोन दिवस सर्वत्र होळी आणि धुळवडीमुळे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. काल जवळपास सर्व सेलिब्रिटींनी रंग खेळले. त्याचबरोबर त्यांचे मित्रमंडळी आणि कुटुंबिय यांच्याबरोबर वेळ घालवला. त्या सर्वांनी त्यांनी होळी कशी साजरी करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यात विकी कौशलचाही समावेश आहे. आता त्याचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

विकी कौशल आणि पत्नी कतरिना कैफ यांनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर होळीचा सण उत्साहात साजरा केला. यादरम्यानचे काही फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असतानाच दुसरीकडे विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी एक त्यांचा आणि विकीचा भांगडा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

आणखी वाचा : …म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित

विकी कौशल पंजाबी आहे. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमध्ये अ ॅक्शन डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते निवृत्त झाले आहेत. होळीच्या निमित्ताने विकी कौशल आणि त्याचे वडील शाम कौशल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विकी कौशल त्याच्या वडिलांबरोबर भांगडा करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ कतरिना कैफने शूट केला आहे. तर त्यांचा हा हटके अंदाज पाहून कतरिनालाही हसू आवरेनासं झालाय आहे.

हेही वाचा : कतरीना आणि विकीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन ? क्लिनिकबाहेरचे फोटो व्हायरल

शाम कौशल यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहीलं, “हॅप्पी होली!” आता त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर्क चर्चेचा विषय ठरत असून त्यांचे चाहते या व्हिडीओवर कमेंट्स करत बाप-लेकाचा हा हटके अंदाज आवडला असल्याचं संगत आहेत.