Vikrant Massey Family : बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीने आज सोशल मीडियावर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्याने अभिनयातून ब्रेक जाहीर केला आहे. त्याचे शेवटचे चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होतील, असं त्याने म्हटलं आहे. यशाच्या शिखरावर असताना विक्रांतने या निर्णयाची घोषणा केल्यावर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

३७ वर्षांचा विक्रांत मॅसी त्याच्या दमदार अभिनयाबरोबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. तो सामाजिक व राजकीय विषयांवरची त्याची मतं ठामपणे मांडत असतो. विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत विक्रांतने त्याच्या कुटुंबातील धार्मिक विविधतेबद्दल खुलासा केला होता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – “मला शांत झोप लागत नव्हती…”, विक्रांत मॅसीने महिन्याला ३५ लाख रुपये मिळत असूनही सोडलेलं टीव्हीवरील काम

आपल्या कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या धर्माचे पालन करतात, असं विक्रांतने सांगितलं होतं. विक्रांतचे वडील ख्रिश्चन धर्माचे पालन करतात, तर त्याची आई शीख धर्माचे पालन करते. विक्रांतचा भाऊ मोईन याने केवळ १७ वर्षांचा असताना इस्लाम धर्म स्वीकारला होता. विक्रांतची पत्नी, अभिनेत्री शीतल ठाकूर ही हिंदू आहे.

हेही वाचा – Vikrant Massey Career: विक्रांत मॅसीची ३७ व्या वर्षी अभिनयातून निवृत्तीची घोषणा! त्याचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घ्या

विक्रांत करवा चौथला पत्नी शीतलच्या पाया पडला होता, त्याने हे फोटो शेअर केल्यावर अनेकांनी त्याला ऑनलाइन ट्रोल केलं. तर काहींनी त्याचं कौतुक केलं होतं. यानंतर त्याने धार्मिक श्रद्धेबाबत मत व्यक्त करत तो व त्याचे कुटुंबीय सर्व धर्मांचा सारखाच आदर करतात, असं सांगितलं. “माझी आई शीख कुटुंबात जन्मली, पण ती तिथे टिकली लावून उभी होती. आपल्याला लहानपणापासून मंदिरात जायला शिकवले जातं. नवरात्रीत माझ्या घराखाली माता राणीचे मंडप लावण्यात आले होते,” असं विक्रांतने सांगितलं.

vikrant massey family
विक्रांत मॅसी, त्याची पत्नी शीतल ठाकूर व त्याचे आई-वडील (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – “मागील काही वर्षे खूपच…”, अभिनेता विक्रांत मॅसीने केली निवृत्तीची घोषणा

विक्रांतच्या कुटुंबातील धार्मिक विविधता

विक्रांत एका धर्मनिरपेक्ष कुटुंबात मोठा झाला. “माझे वडील ख्रिश्चन धर्म पाळतात आणि ते वैष्णोदेवी मंदिरात सहा वेळा गेले आहेत. ते आताही आठवड्यातून दोन वेळा चर्चला जातात. राहुल, रोहित या नावाचे अनेक ख्रिश्चन तुम्हाला आपल्या देशात आढळतील. आम्ही स्वतः गुरुद्वारांमध्ये जातो आणि बरेच हिंदू अजमेर शरीफ दर्ग्यात जातात. हा आपला हिंदुस्थान आहे. आता लोकांना या गोष्टींचं इतकं आश्चर्य का वाटतं? माझ्या घरात मंदिर आहे. माझ्या मुलाचे नाव वरदान आहे,” असं विक्रांत शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.

हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा

विक्रांतने त्याच्या भावाने लहान वयात धर्मांतर केलं होतं, त्याबद्दल माहिती दिली होती. भावाने इस्लाम स्वीकारला असला तरी तो हिंदू सण साजरे करतो, असं विक्रांतने म्हटलं होतं. “माझा भाऊ दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो. त्याने इस्लाम धर्म स्वीकारणं ही त्याची वैयक्तिक निवड आहे. पण आम्ही दिवाळी आणि होळी एकत्र साजरी करतो. ईदला आम्ही त्याच्या घरी बिर्याणी खातो,” असं विक्रांतने सांगितलं होतं.

Story img Loader