Vivek Oberoi: विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या राय यांचं एकेकाळी एकमेकांवर प्रेम होतं, हे सर्वश्रूत आहे. पण ऐश्वर्याआधी त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती. ऐश्वर्याशी ब्रेकअपनंतर काही वर्षांनी विवेकने प्रियंका अल्वाशी लग्न केलं. आता विवेक प्रियंकाला भेटण्यापूर्वी आणि लग्न करण्यापूर्वी झालेल्या त्याच्या प्रेमभंगाबद्दल व्यक्त झाला आहे. विवेकने अवघ्या १७ व्या वर्षी त्याच्या बालपणीच्या प्रेयसीला कर्करोगामुळे गमावलं. तिच्या जाण्यानंतर जो भावनिक संघर्ष करावा लागला, त्याबद्दल विवेकने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवेक व त्याची गर्लफ्रेंड खूप लहान असतानाच डेट करू लागले होते. पण तिला १७ व्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले आणि त्या घटनेचा विवेकवर मोठा परिणाम झाला. “माझी बालपणीची प्रेयसी—ती १२ वर्षांची, मी १३ वर्षांचा होतो आणि आम्ही डेटिंग करत होतो. मी १८ वर्षांचा व ती १७ वर्षांची झाल्यावर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. मला वाटलं, ‘आता जे आहे ते हीच आहे.’ आम्ही एकत्र कॉलेजला जायचो. लग्न आणि मुलांबद्दलही आम्ही बोलायचो. माझं तिच्याबरोबरचं आयुष्य कसं असेल याची कल्पना मी माझ्या मनात केली होती,” असं विवेकने MensXP ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

हेही वाचा – एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”

मला वाटलं तिला सर्दी झाली आहे, पण…

तिच्या अकाली मृत्यूने विवेक खूप दुखावला होता. “मी तिला फोन करायचा प्रयत्न करत होतो, पण ती काही उत्तर देत नव्हती. तिने आधी सांगितलं होतं की तिला बरं वाटत नाही आणि मला वाटलं की तिला फक्त सर्दी झाली आहे. पण मी तिच्याशी किंवा तिच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकलो नाही; त्यानंतर मी तिच्या चुलत बहिणीला कॉल केला. तिने सांगितलं की ती हॉस्पिटलमध्ये आहे. मी हॉस्पिटलला पोहोचलो. आम्ही ५-६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. अचानक मला कळलं की ती लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. आम्ही खूप प्रयत्न केले, पण त्यानंतर दोन महिन्यांतच तिचे निधन झाले. मी तिच्या मृत्यूने हादरलो होतो,” असं विवेक ओबेरॉयने सांगितलं.

हेही वाचा – तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

तिच्या निधनाचा खोलवर परिणाम झाला – विवेक

विवेक पुढे म्हणाला, “तिच्या निधनाचा माझ्यावर इतका खोलवर परिणाम झाला की, खूपदा इतरांमध्ये मला ती दिसायची. खरं तर मी तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिथं होतो, जे घडलं ते डोळ्यांसमोर होतं; पण तरीही ती गेली हे मान्य करायला मी तयारच नव्हतो. या अनुभवामुळे कॅन्सरशी झुंज देत असलेल्या मुलांबरोबर काम करताना मला मदत झाली.” या हृदयद्रावक अनुभवाने आयुष्य आणि नातेसंबंधांबद्दलचा दृष्टिकोन बदलला आणि तेव्हापासून, मी आपल्या जवळच्या लोकांबरोबर प्रत्येक क्षण जगायचं ठरवलं, असं विवेकने सांगितलं.

हेही वाचा – “आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…

विवेक ओबेरॉयने १४ वर्षांपूर्वी २०१० मध्ये प्रियंका अल्वाशी लग्न केलं. या जोडप्याला दोन अपत्ये आहेत. त्यांच्या मुलाचे नाव विवान आहे, तर मुलीचे नाव अमेया निर्वाणा आहे. विवेक आता कुटुंबाबरोबर दुबईमध्ये राहतो. त्याचा व्यवसाय तिथे असल्याने तो जास्त वेळ दुबईत घालवतो. शूटिंग व इतर कामानिमित्त तो मुंबईत येत असतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor vivek oberoi childhood sweetheart died of cancer at 17 says i used to see her in other hrc