scorecardresearch

Premium

आलिया भट्ट नोव्हेंबर महिन्यातील ‘या’ दिवशी देऊ शकते बाळाला जन्म, जाणून घ्या तारीख व वार

आलिया भट्टच्या बाळासाठी कपूर कुटुंबियाप्रमाणेच चाहतेही उत्सुक आहेत.

alia bhatt pregnancy news
आलिया भट्ट नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या बाळासाठी कपूर कुटुंबियाप्रमाणेच चाहतेही उत्सुक आहेत. बाळाच्या आगमनाची जय्यत तयारी कपूर कुटुंबियांकडून केली जात आहे. दिवाळीपूर्वीच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

आलिया भट्ट नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘ईटाइम्स’ला सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, आलिया २० ते ३० नोव्हेंबर या दिवसांमध्ये बाळाला जन्म देऊ शकते. विशेष म्हणजे आलियाची बहीण शाहीन भट्टचा वाढदिवसही नोव्हेंबर महिन्यातील २८ तारखेला असतो. त्यामुळे मावशीच्या वाढदिवशी आलियाचं बाळ जन्माला येऊ शकते. नोव्हेंबर महिन्यातील २८ तारखेला सोमवार आहे. गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात आलिया तिच्या बाळाला जन्म देणार आहे. या रुग्णालयात तिचं नाव नोंदविण्यात आलं आहे.

loksatta test series
UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – २०
man shares video of gurugram traffic jam people Compairs it withbengaluru traffic
बंगळुरू नव्हे, गुरुग्राम आहे हे! प्रंचड मोठ्या वाहतूक कोंडीचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले
Gold Silver Price
Gold-Silver Price on 1 October 2023: सोने-चांदीने घेतला यू-टर्न; महिन्याच्या पहिल्या दिवशी भाव वधारला
mugdha vaishampayan shared birthday wish post for boyfriend prathamesh laghate
“माय मॅन…”, प्रथमेशच्या वाढदिवसासाठी मुग्धाची खास पोस्ट, गोव्यातून शेअर केला रोमॅंटिक फोटो

हेही वाचा >> Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा किसिंग सीन व्हायरल, ‘प्रेम प्रथा धुमशान’मधील बोल्ड अंदाज चर्चेत

हेही वाचा >> “१०० कोटी देतो, कुत्र्याबरोबर सेक्स…”, आहाना कुमराने साजिद खानवर केले होते गंभीर आरोप

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने १४ एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. आलिया अनेकदा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. तर रणबीरही कार्यक्रमादरम्यान आलियाची काळजी घेताना कित्येकदा कॅमेऱ्यात कैदही झाला. कपूर कुटुंबियांनी आलिया-रणबीरसह दिवाळी साजरी केली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अ‍ॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा

दरम्यान होणाऱ्या बाळासाठी आलिया व रणबीरही उत्सुक आहेत. रणबीरने बाळासाठी कामातून काही वेळ ब्रेक घेणार असल्याचं सांगितलं होतं. तर आलियाही एक वर्ष कोणतेही काम करणार नसल्याचं ती बोलली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress alia bhatt could deliver her baby on this day of november kak

First published on: 29-10-2022 at 10:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×