scorecardresearch

“चित्रपट माझं पहिलं प्रेम पण…” राहाच्या जन्मानंतर आलिया भट्टने करिअरबाबत घेतला मोठा निर्णय

आता तिचं प्राधान्य बदललं असल्याचं तिने सांगितलं.

alia bhatt

आलिया भट्ट ही तिच्या लग्नापासून चांगलीच चर्चेत आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच तिने ती आई होणार असल्याची बातमी तिने चाहत्यांशी शेअर केली. तर तीन महिन्यांपूर्वीच तिला कन्यारत्न प्राप्त झालं. आता काही महिने कामातून ब्रेक घेत ती पालकत्व एन्जॉय करताना दिसतेय. आता नुकतीच तिने का कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यात आता तिचं प्राधान्य बदललं असल्याचं तिने सांगितलं.

आलिया नुकतीच झी सिने अवॉर्ड्सच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी तिने विविध प्रश्नांची उत्तरे दिलखुलास गप्पा मारल्या. आई झाल्यानंतर अभिनेत्री आपोआप कमी प्रमाणात काम करू लागतात याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. तर आलिया भट्टही तसंच करणार का याचा खुलासा तिने यावेळी केला. चित्रपट हे तिचं पहिलं प्रेम असलं तरीही आता राहाला ती प्राधान्य देणार असल्याचं तिने सांगितलं. परंतु हे ठरवल्यावर कामाच्या बाबतीतही तिने एक मोठा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : आलिया भट्ट पुन्हा गरोदर? फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, “२.०…”

आलिया म्हणाली, “आता सध्या माझ्या आयुष्यात राहा हेच प्राधान्य आहे. पण चित्रपट आणि चित्रपटांमध्ये काम करणं हे माझं पहिलं प्रेम आहे. त्यात मी नक्कीच काम करत राहणार आहे. पण आता अधिक चित्रपटांमध्ये काम करण्यापेक्षा मी चित्रपटाच्या क्वालिटीचा विचार करेन. मी मोजकेच पण उत्कृष्ट चित्रपट करेन. मी क्वालिटी ओव्हर क्वांटिटी याला भर देईन.”

हेही वाचा : “माझी सून फारच…” आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलल्या नीतू कपूर

दरम्यान आलियाने आता राहाच्या जन्मानंतर पुन्हा एकदा चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. त्याचप्रमाणे ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातूनही यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याचबरोबर फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 12:43 IST