scorecardresearch

Premium

अनुष्का शर्माच्या आयुष्यात ‘या’ २ गोष्टींमुळे झाला बदल, चाहत्यांना सल्ला देत म्हणाली, “रात्रीचे नऊ वाजले की…”

अनुष्का शर्माने आपल्या चाहत्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

anushka sharma puma interview
अनुष्का शर्माने आपल्या चाहत्यांना दिला महत्त्वाचा सल्ला ( फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

भारतीय फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम चर्चेत असतात. अलीकडेच दोघांनी ‘प्युमा’ (Puma) या स्पोर्ट्स ब्रॅंडच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान मुलाखतकाराने या जोडीला भन्नाट प्रश्न विचारले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “गौरीने मला कधीच गिफ्ट दिले नाही, कारण…” शाहरुख खानचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल, पत्नीविषयी केला होता मजेशीर खुलासा

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

अनुष्का शर्माला या कार्यक्रमादरम्यान तुझ्या जीवनात कशामुळे बदल झाला आणि तू तुझ्या चाहत्यांना कोणता सल्ला देशील? असा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकून अनुष्का शर्मा सर्वात आधी हसली आणि म्हणाली, “माझ्या आयुष्यात दोन गोष्टींमुळे प्रचंड बदल झाला. कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण, मी कायम रात्री लवकर झोपते आणि रात्रीचे जेवण संध्याकाळी जेवते. मी रात्रीचे नऊ – साडेनऊ वाजले की झोपते…” यावर उपस्थितांनी आश्चर्य व्यक्य केले.

हेही वाचा : हृतिक रोशनसमोर विकी कौशलने टेकले गुडघे; IIFA सोहळ्यातील ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “२३ वर्षं झाली पण…”

अनुष्का रात्री एवढ्या लवकर झोपते हे ऐकून मुलाखतकाराने पुढे विचारले मग तू जेवतेस किती वाजता? यावर अनुष्का म्हणाली, “मी संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत जेवते. मला या जीवनशैलीमुळे खूप फरक जाणवला, माझ्या आरोग्यविषयक समस्यांचेही निराकरण झाले. पहाटे साडेपाच ते सहा वाजता माझा दिनक्रम सुरु होतो, त्यानंतर दुपारचे जेवण मी आणि माझी मुलगी एकत्र ११ वाजता जेवतो.”

हेही वाचा : “वडिलांच्या निधनानंतरही मी रडले नव्हते, कारण…”; ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सांगितला आयुष्यातील ‘तो’ प्रसंग

अनुष्काने वैयक्तिक आयुष्याविषयी केलेला खुलासा ऐकून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले, अनेकांनी “सकाळी तू जेवतेस तेव्हा आम्ही ऑफिसलाही पोहचत नाही” असे तिला सांगतिले. दरम्यान, लेक वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने बॉलीवूडमधून काही काळ ब्रेक घेतला असून, यापुढे मुलीकडे सर्वाधिक लक्ष देत वर्षाला एखादा चित्रपट करण्यास प्राधान्य देणार असेही अनुष्का शर्मा या कार्यक्रमादरम्यान म्हणाली. लवकरच ती ‘चकदा एक्स्प्रेस’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress anushka sharma advised to fans and talks about her daily healthy lifestyle sva 00

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×