भारतीय फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम चर्चेत असतात. अलीकडेच दोघांनी ‘प्युमा’ (Puma) या स्पोर्ट्स ब्रॅंडच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान मुलाखतकाराने या जोडीला भन्नाट प्रश्न विचारले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अनुष्का शर्माला या कार्यक्रमादरम्यान तुझ्या जीवनात कशामुळे बदल झाला आणि तू तुझ्या चाहत्यांना कोणता सल्ला देशील? असा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकून अनुष्का शर्मा
अनुष्का रात्री एवढ्या लवकर झोपते हे ऐकून मुलाखतकाराने पुढे विचारले मग तू जेवतेस किती वाजता? यावर अनुष्का म्हणाली, “मी संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत जेवते. मला या जीवनशैलीमुळे खूप फरक जाणवला, माझ्या आरोग्यविषयक समस्यांचेही निराकरण झाले. पहाटे साडेपाच ते सहा वाजता माझा दिनक्रम सुरु होतो, त्यानंतर दुपारचे जेवण मी आणि माझी मुलगी एकत्र ११ वाजता जेवतो.”
अनुष्काने वैयक्तिक आयुष्याविषयी केलेला खुलासा ऐकून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले, अनेकांनी “सकाळी तू जेवतेस तेव्हा आम्ही ऑफिसलाही पोहचत नाही” असे तिला सांगतिले. दरम्यान, लेक वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने बॉलीवूडमधून काही काळ ब्रेक घेतला असून, यापुढे मुलीकडे सर्वाधिक लक्ष देत वर्षाला एखादा चित्रपट करण्यास प्राधान्य देणार असेही अनुष्का शर्मा या कार्यक्रमादरम्यान म्हणाली. लवकरच ती ‘चकदा एक्स्प्रेस’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress anushka sharma advised to fans and talks about her daily healthy lifestyle sva 00