scorecardresearch

“तू तुझ्या आई-बाबांना…” अनुष्का शर्माचा ‘रब ने बना दी जोडी’च्या दिग्दर्शकाबद्दल मोठा खुलासा

अनुष्का शर्मा लवकरच माजी भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस’मध्ये दिसणार आहे

anushka-sharma
अनुष्का शर्मा

बॉलिवूडच्या टॉप १० अभिनेत्रींपैकी एक म्हणून अनुष्का शर्माला ओळखले जाते. आता लवकरच ती सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटातून अनुष्का लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या निमित्ताने अनुष्काने एक मुलाखत दिली. त्यात तिने आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला.

अनुष्का शर्मा गेल्या चार वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिचा ‘झिरो’ हा शेवटचा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने थोडा वेळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. या काळात तिने तिची मुलगी वामिकाच्या संगोपनावर पूर्ण लक्ष दिले. अनुष्का शर्माने २००८ मध्ये आदित्य चोप्राच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
आणखी वाचा : अनुष्का शर्मा पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना पूर्णविराम, विराट कोहलीसोबत रुग्णालयात जाण्याचे कारण समोर

नुकतंच अनुष्का शर्माला एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी अनुष्का शर्माने आदित्य चोप्रा आणि ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाबद्दल एक गुपित सांगितले.

“मी आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटात सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात ‘सुरिंदर’ आणि ‘तानी’ यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. पण जेव्हा आदित्यने मला चित्रपटासाठी विचारले, तेव्हा त्याने एक अट घातली होती. आदित्यला या चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती उघड करायची नव्हती. त्याला सर्व काही गुपित ठेवायचे होते.”

आणखी वाचा : Video : मुंबईत पत्नीसह मनसोक्त फिरताना दिसला प्रसिद्ध क्रिकेटपटू, तुम्हाला ओळखता येतंय का?

‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटाबद्दल कोणालाच कोणतीही माहिती मिळू नये, असे आदित्यला कायम वाटायचे. त्याबरोबरच मी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, हे देखील कोणाला कळू नये. त्यावेळी त्याने मला सांगितले होते की, तू या चित्रपटात काम करतेस हे तुला कोणालाही सांगता येणार नाही. अगदी तू तुझ्या आई-बाबांनाही हे सांगू शकत नाही, असे अनुष्का शर्मा म्हणाली.

दरम्यान अनुष्का शर्मा ही लवकरच माजी भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 09:09 IST