बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू सध्या मातृ्त्वाचा अनुभव घेत आहे. काही महिन्यांपूर्वी बिपाशाने आई झाल्याची गुडन्यूज दिली आहे. बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. बिपाशा बासूने तिचे नाव देवी बासू सिंह ग्रोवर असे ठेवले आहे. नुकतंच बिपाशा बासूने तिच्या मुलीच्या हृदयाला जन्मत: दोन छिद्रं असल्याचा खुलासा केला आहे. तसेच तीन महिन्यांची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचेही तिने सांगितले आहे.

बिपाशा बासूने नुकतंच अभिनेत्री नेहा धुपियाबरोबर इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी तिला तिची मुलगी देवी सिंह ग्रोवरबरोबरचा मातृत्व अनुभवण्याचा प्रवास कसा होता? काही अडचणी आल्या का? याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने तिच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितलं.
आणखी वाचा : इलियाना डिक्रुझ विवाहबद्ध? पतीचे नाव ते लग्नाची तारीख; सर्व माहिती आली समोर

alimony for muslim women supreme court verdict on maintenance to divorced muslim
अन्वयार्थ : ‘शाहबानो’ला न्याय
Twelve year girl rescued from obesity Treatment by bariatric surgery pune print news
बारा वर्षांच्या मुलीची लठ्ठपणापासून सुटका; बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेद्वारे उपचार; वजन १०६ वरून ८६ किलो
Genital surgery, child,
ठाणे : शहापूरमध्ये परवानगीशिवाय मुलाच्या गुप्तांगाची शस्त्रक्रिया, पायाच्या शस्त्रक्रियेसाठी झाला होता रुग्णालयात दाखल
My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!
29th June Marathi Panchang & Rashi Bhavishya
२९ जून पंचांग: शनी निघाले वक्र चालीत पुढे, बुधाचाही राशी बदल; आज १२ राशींच्या तन – मन – धनाची शक्ती कशी वाढेल?
Shukra Gochar 2024
७ जुलैपासून पुढील २३ दिवसांपर्यंत या राशीच्या लोकांची होईल चांदी, शुक्र कर्क राशीत प्रवेश करताच मिळेल पैसाच पैसा
Rahu In Shani Nakshatra Gochar 2024
शनीच्या नक्षत्रात सोन्याचे दिवस, ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुरु; तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?
Bypass surgery, Nagpur,
नागपूर एम्समध्ये बायपास शस्त्रक्रिया ठप्प, भूलतज्ज्ञ सुट्टीवर…

यावेळी बोलताना बिपाशा म्हणाली, “देवीचा जेव्हा जन्म झाला त्यावेळी ती वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (Ventricular septal defect) ने ग्रस्त होती. माझा आणि करणचा हा संपूर्ण प्रवास कोणत्याही सर्वसामान्य पालकांपेक्षा खूप वेगळा होता. सध्या माझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय, त्याच्यापेक्षा तो काळ फार कठीण होता. हे कोणत्याही आईच्या बाबतीत होऊ नये अशी माझी इच्छा आहे.

माझी लेक देवी तिचा जन्म झाला आणि तिच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की आमच्या मुलीच्या हृदयाला दोन छिद्रे आहेत. मी असं ठरवलं होतं की याबद्दल कुठेही काहीही भाष्य करणार नाही. पण मला आता हे सांगावंसं वाटतंय कारण यादरम्यान मला अनेकांनी मदत केली. आम्हाला VSD म्हणजे काय, याची माहिती नव्हती. तिच्या या आजाराबद्दल ऐकल्यानंतर आम्हाला धक्काच बसला होता. आम्ही आमच्या कुटुंबाशीही याबद्दल चर्चा केली नाही. कारण आम्ही दोघे थोडे घाबरलो होतो.”

आणखी वाचा : लग्न न करताच इलियाना डिक्रुझ झाली आई, गोंडस बाळाचा पहिला फोटो आला समोर, नावही आहे खास

त्यापुढे बिपाशा म्हणाली, “आम्हाला हे समजल्यानंतर मी आणि करण सुन्न झालो. देवीच्या जन्मानंतरचे पहिले पाच महिने आमच्यासाठी खरंच खूप कठीण होते. तिच्या हृदयाला असलेली दोन छिद्र आपोआप बरी होतात का, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला दर महिन्याला देवीला रुग्णालयात घेऊन जावे लागायचे. त्या ठिकाणी तिचे स्कॅनिंग केले जायचे. पण तिच्या हृदयाला असलेली छिद्र खूप मोठी होती. त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. देवी तीन महिन्यांची झाल्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असेही त्यांनी आम्हाला सांगितले.

मला तेव्हा धक्का बसला होता. पण माझा देवावर विश्वास होता. इतक्या लहान मुलीच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणं, हेच माझ्यासाठी सर्वात जास्त भीतीदायक होते. दोन महिन्यात काहीतरी चमत्कार होईल आणि हृदयाला असलेली छिद्र कमी होतील, असे आम्हाला वाटत होते. पण तसे झाले नाही. ती तीन महिन्यांची झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तिथे तिचे स्कॅन करण्यात आले. त्यांनी शस्त्रक्रिया करावीच लागेल, असे सांगितले. त्यावेळी मी तिच्यावर शस्त्रक्रियेसाठी तयार होते. पण करण मात्र नकार देत होता. मला माहिती होते की, ती नक्कीच बरी होईल. तिला काहीही होणार नाही आणि देवाच्या कृपेने ती आता बरी आहे.”

आणखी वाचा : लग्नाच्या ६ वर्षांनंतर बिपाशा बासू झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म

“देवी तीन महिन्यांची असताना तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची ही शस्त्रक्रिया जवळपास ६ तासांची होती. जेव्हा तिला ऑपरेशन थिएटरमध्ये आणण्यात आले तेव्हा तिचे आयुष्य थांबलं होतं. तिच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे तिला आराम मिळाला. आता देवी बरी आहे”, असे बिपाशा बासूने सांगितले.