"गौरी आणि रणवीरला...." भर स्टेजवर दीपिका पदुकोणने शाहरुखला केलं किस; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल spg 93 | actress deepika padukon kiss shahrukh khan on stagr while talking with media | Loksatta

“गौरी आणि रणवीरला….” भर स्टेजवर दीपिका पदुकोणने शाहरुखला केलं किस; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

शाहरूख आणि दीपिकाच्या बेशरम गाण्याने वाद निर्माण झाला होता

deepika srk
फोटो सौजन्य : लोकसत्तात ग्राफिक टीम

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडताना दिसून येत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी करत आहेत. ‘पठाण’ चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर या चित्रपटाची संपूर्ण टीम पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर आली. यावेळी दीपिकाच्या त्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधले तसेच तिला ट्रोलदेखील करण्यात आले.

शाहरुखच्या ‘पठाण’ची चर्चा जगभरात आहे. देशभरात या चित्रपटाने २८० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाला मोठया प्रमाणावर यश मिळाले आहे. नुकतेच चित्रपटाच्या टीमने प्रसार माध्यमांसमोर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, पत्रकारांच्या प्रश्नांना टीमने उत्तर दिली त्याच बरोबरीने दीपिकाने स्टेजवर शाहरुख खानला किस केलं. तिच्या या कृतीमुळे आता नेटकरी तिला ट्रोल केलं आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा दबदबा; ‘शेहजादा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाच्याबाबतीत घेतला मोठा निर्णय

दीपिका शाहरुख खानला किस करतानाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, “हे नक्की काय करत आहेत?” तर दुसऱ्याने लिहले आहे “गौरी आणि रणवीरला बोलवा,” एकाने तर चक्क शाहरुख खानला धमकीवजा कमेंट केली आहे तो असं म्हणाला, “थांब रणवीरला हा व्हिडीओ पाठवतो” अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानची झलक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 19:24 IST
Next Story
Video : …अन् राखी सावंतच्या श्वानानेही घेतलं तिच्या आईचं अंतिम दर्शन, ‘तो’ भावूक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल