Hansika Motwani Shares Fitness & Skincare Routine : बॉलीवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री असो… मनोरंजन विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या अभिनयाबरोबरच सौंदर्य आणि फिटनेसमुळेदेखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहत असतात. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे, हंसिका मोटवानी.
आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी हंसिका तिच्या सौंदर्याने आणि फिटनेससुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या फिटनेसबद्दलची माहिती दिली होती.
हंसिका मोटवानीने आरोग्य आणि जीवनशैलीबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या होत्या. हंसिकाने स्वत:चे स्कीन केअर रूटीनसुद्धा शेअर केले होते. तिच्या त्वचेचे सर्वांत मोठे रहस्य म्हणजे, ‘सनस्क्रीन’चा वापर. तिने सांगितले होते की, ती नियमितपणे सनस्क्रीन लावते आणि चेहरा वारंवार धुते. त्यामुळेच तिची त्वचा कायम फ्रेश राहते.
तसेच हंसिकाने तिच्या खाण्या-पिण्याच्या सवयींबद्दल बोलताना म्हटले होते की, ती अजिबातच ‘फूडी’ नाही. अनेकांना असे वाटते की, तिला खायला खूप आवडते; पण हे सत्य नाही. त्याबाबत ती म्हणाली होती, “मी केवळ स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी जेवते. गरज पडल्यास मी दोन-दोन दिवस न जेवताही राहू शकते.”
I Dream Media ला दिलेल्या मुलाखतीत हंसिकाने सांगितले होते की, फिट राहण्यासाठी तिला कठीण व्यायामापेक्षा साधे आणि सोपे व्यायाम करायला आवडतात. ‘पिलेट्स’ हा तिचा आवडता व्यायाम आहे. या व्यायामामुळे तिचे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. त्याशिवाय तिला योगासने, पोहणे आणि हलकासा व्यायाम करायला आवडतो. जिममधील कठीण व्यायामापेक्षा नैसर्गिक पद्धतीने फिट राहण्यावर ती अधिक भर देते.
हंसिका सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचा गेल्या महिन्यात घटस्फोट झाला. हंसिका मोटवानी आणि पती सोहेल लग्नाच्या तीन वर्षांनी विभक्त झाले आहेत. अशातच गेल्या महिन्यात ११ मार्च रोजी मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने आज (११ मार्च रोजी) हंसिका व सोहेलचा घटस्फोट मंजूर केला.
हंसिका सध्या कुटुंबियांबरोबर जपानमधील सुट्टी एन्जॉय करत आहे. जपानमढेल खास फोटो तिने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. अभिनेत्री आई आणि भावाबरोबर जपानमध्ये सुट्टीसाठी गेली आहे.
