इलियाना डिक्रूज ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. तर आता तिच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वळवलं आहे. ती आई होणार असल्याचं तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केलं आहे.

काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘कॉफी विथ करण सीझन ७’मध्ये करणने याबद्दल भाष्य केलं होतं. पण इलियानाने आतापर्यंत त्याच्याशी लग्न केलेलं नाही. त्यानंतर आता इलियानाने गरोदरपणाची घोषणा करतातच तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
protest against netyanahu in israel
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये आंदोलन पेटले; कारण काय? मारले गेलेले सहा ओलिस कोण होते? त्यांची हत्या का करण्यात आली?
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल
uttarakhand police news cow meat
Cow Meat Smuggling Suspect Died: …आणि जमावानं पोलिसांची आख्खी तुकडीच ठेवली ओलीस, केली धक्काबुक्की; उत्तराखंडमध्ये गोमांस तस्करीच्या आरोपावरून जमाव संतप्त!
raped on dog up
Animal Cruelty on Dog: विकृत नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, व्हायरल व्हिडीओनंतर आरोपीला अटक

आणखी वाचा : इलियाना डिक्रुझला तमिळ सिनेसृष्टीतून केलं बॅन? अखेर सत्य आलं समोर

इलियानाने आज सकाळी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो पोस्ट केले. पहिल्या फोटोत बाळाचे कपडे दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘ममा’ असं लिहिलेली एक चेन दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “कमिंग सून… तुला भेटण्याची मी आणखीन वाट पाहू शकत नाही माय लिटिल डार्लिंग.” पण ही पोस्ट शेअर करताना इलियानाने तिच्या बाळाच्या वडिलांची ओळख गुप्त ठेवली आहे.

हेही वाचा : “मला रोज रात्री…”; इलियाना डिक्रूझने उघड केली होती तिची विचित्र सवय

इलियानाची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण जाणून घेण्यासाठी तिथे चाहते उत्सुक झाले आहेत. आता तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते, मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.