Kangana Ranaut sold her Pali Hill bungalow: बॉलीवूड अभिनेत्री व भाजपा खासदार कंगना रणौत यांनी त्यांचा मुंबईतील पाली हिल भागातील बंगला विकला आहे. गेले अनेक दिवस कंगना हा बंगला विकणार असल्याची चर्चा होती. अखेर या बंगल्याची विक्री झाली आहे. हा बंगला किती कोटींना विकला गेला, याची माहितीदेखील समोर आली आहे.

झापकी या वेबसाईटवरील मालमत्ता नोंदणी दस्तऐवजानुसार, कंगना रणौत यांनी मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल भागातील बंगला ३२ कोटींना विकला आहे. हा बंगला त्यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये २० कोटी रुपयांना खरेदी केला होता, अशी माहिती कागदपत्रांमधून समोर आली आहे. सात वर्षांनी हा बंगला १२ कोटी रुपयांच्या नफ्यासह ३२ कोटींमध्ये त्यांनी विकला आहे. हा बंगला ३,०७५ स्क्वेअर फूट जागेवर पसरलेला आहे आणि ५६५ स्क्वेअर फूट पार्किंग स्पेस आहे, असंही कागदपत्रात नमूद केलेलं आहे.

आमिर खानच्या सावत्र भावाशी पळून जाऊन केलं लग्न, ५ वर्षांत मोडला आंतरधर्मीय प्रेमविवाह; अभिनेत्री म्हणाली, “खूपच वाईट…”

बंगल्यासाठी भरले १.९२ कोटींचे मुद्रांक शुल्क

या बंगल्याच्या विक्रीसंदर्भात ५ सप्टेंबर २०२४ रोजी व्यवहार पार पडले व नोंदणी झाली. या बंगल्यासाठी खरेदीदाराने तब्बल एक कोटी ९२ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे, अशी माहिती कागदपत्रांमध्ये दिली आहे. हा बंगला कमलिनी होल्डिंग्समधील भागीदार श्वेता बथिजाने घेतला आहे, ती तामिळनाडूमधील कोईम्बतूर इथे राहते.

निक्कीशी जवळीक असलेल्या अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय, नेटकरी म्हणाले, “तू कोणत्या त्रासातून…”

कंगना रणौत यांची एकूण संपत्ती

Kangana Ranaut Property: कंगना रणौत मुळच्या हिमाचल प्रदेशातील आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मंडी मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. त्यानी मे २०२४ मध्ये अर्ज भरताना त्यांच्या संपत्तीबद्दल प्रतिज्ञापत्रात माहिती दिली होती. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपयांची आहे. त्यांच्याजवळ २८.७ कोटींची जंगम आणि ६२.९ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.