scorecardresearch

“मला विवाहित पुरुषांमध्ये…” जेव्हा करीनाने हृतिकबद्दलच्या नात्यावर केला होता खुलासा

करीना- हृतिक ‘यादे’ चित्रपटात झळकले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा कधी एकत्र काम केले नाही

“मला विवाहित पुरुषांमध्ये…” जेव्हा करीनाने हृतिकबद्दलच्या नात्यावर केला होता खुलासा
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तो त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. लवकरच हृतिक दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. तर त्याचबरोबर यावर्षी तो त्याची गर्लफ्रेंड सबा आझादशी लग्न करण्याच्या तयारीत आहे असंही समोर आलं आहे. सबाच्या आधी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींनशी जोडले आहे.

हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली होती. मात्र कंगनाच्या आधी हृतिकच नाव बेबो अर्थात करीना कपूरबरोबर जोडलं गेलं होत. २००३ साली आलेल्या ‘मै प्रेम की दिवानी हू’ या चित्रपटात दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात त्यांचे रोमँटिक सीन्स होते, चित्रपटानंतर या दोघांच्या नात्याबद्दल बातम्या येऊ लागल्या होतंय इतकं की हृतिक रोशन करीना बरोबर लग्न करण्यासाठी तयार झाला होता.

Pathaan Trailer : ‘RRR’ सारख्या अ‍ॅक्शनपटात काम केलेल्या अभिनेत्याने शाहरुखच्या ‘पठाण’चं केलं कौतुक; म्हणाला….

या संपूर्ण प्रकरणावर हृतिकने एका मुलाखतीत खुलासा केला होता, तो असं म्हणाल, “करीना कपूरबरोबरचे ते प्रकरण आता संपले आहे. मी माझे कुटूंब, मित्र आणि पत्नी सुझानचे आभार मानतो त्यांनी या अफवांवर विश्वास ठेवला नाही. करीना माझ्या पत्नीशी तिचे मैत्रीपूर्वक संबंध आहेत. ती माझ्या बहिणीलाही चांगली ओळखते. मला एकाच व्यक्तीबद्दल वाईट वाटतं ती व्यक्ती म्हणजे करीना, मला या गोष्टींचा फरक पडत नाही. ती म्हणते तिला ही फरक पडत नाही मात्र मी तिला आणि तिच्या कुटुंबियांना किती वाईट वाटले असेल याची कल्पना मी करू शकतो.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.

“केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्ड…” ‘पठाण’ चित्रपटाच्या वादावर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया चर्चेत

हृतिकच्याबरोबरीने करीनानेदेखील या प्रकरणावर भाष्य केलं होत, करीना म्हणाली होती, “या क्षेत्रात अशा अफवा पसरत असतात. आज नाव हृतिकशी जोडले जात आहे, उद्या दुसरे कोणीतरी असेल. जोपर्यंत मला सत्य माहित आहे तोपर्यंत सर्व काही ठीक आहे. मला विवाहित पुरुषांमध्ये कधीच रस नाही आणि होणारही नाही. विवाहित पुरुष माझ्या करिअरसाठी धोकादायक ठरू शकतात.” अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.

करीना- हृतिक ‘यादे’ चित्रपटात झळकले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा कधी एकत्र काम केले नाही. हृतिक नुकताच ‘विक्रम वेधा’ चित्रपटात झळकला होता तर करीना ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात शेवटची दिसली होती. सध्या ती हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटात काम करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 15:13 IST

संबंधित बातम्या