प्रत्येक सेलिब्रिटी हा त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असतो. स्टार्स कशा प्रकारे फॅशन करतात, ते काय कपडे परिधान करतात, त्या कपड्यांच्या किमती काय असतात, याच्या अनेकदा चर्चा रंगतात. यापैकीच एक म्हणजे धक धक गर्ल माधुरी दीक्षित. माधुरीचा ग्लॅमरस अंदाज नेहमीच सर्वांना भावतो. आता तिचा एक ड्रेस आणि खास करून त्याची किंमत ही चर्चेचा विषय बनली आहे.

माधुरी सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच तिचे विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते. कधी भरजरी साडी, कधी पॅन्ट शर्ट, कधी गाऊन, तर कधी साध्या -सोबर ड्रेसमध्ये ती दिसते. हे सेलिब्रिटी जे कपडे घालतात त्यांच्या किमती जवळपास गगनाला भिडलेल्या असतात. त्यांचे ब्रॅण्डेड कपडे हे जवळपास लाखांच्या घरात असतात. पण माधुरी आता याला अपवाद ठरली आहे.

आणखी वाचा : माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

माधुरीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साधी चिकनकारी कुर्ती परिधान केलेली दिसत आहे. तिने परिधान केलेल्या या कुर्तीची किंमत आता समोर आली आहे. त्या कुर्तीमध्ये माधुरी खूप सुंदर दिसत होती. तिचीही कुर्ती ‘हाऊस ऑफ चिकनकारी’ या ब्रॅण्डची असून तिची किंमत तीन हजाराहूनही कमी आहे. माधुरीने परिधान केलेल्या या गुलाबी रंगाच्या कुर्तीची किंमत फक्त २९५० रुपये आहे.

हेही वाचा : Video: माधुरी दीक्षितने दिले मिसळ बनवण्याचे धडे, खास टिप्स शेअर करत म्हणाली…

माधुरीच्या या कुर्तीची किंमत कळल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. याचबरोबर आता तिच्या या साधेपणाचं सोशल मीडियावरून कौतुक होत आहे.

Story img Loader