scorecardresearch

Video: हटके ड्रेस परिधान केल्यामुळे मलायका अरोरा ट्रोल, नेटकरी म्हणाले “उर्फी जावेद…”

मलायका अरोराची नेटकऱ्यांनी केली उर्फी जावेदशी तुलना

malaika arora troll
मलायका अरोरा ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मलायका अरोरा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील मलायकाचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन मलायकाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाने काळ्या व फिकट चॉकलेटी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. मलायकाचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांना सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदची आठवण झाली आहे. नेटकऱ्यांनी मलायकाची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या दिग्दर्शकाने दिली गूड न्यूज, घरी चिमुकल्याचं आगमन

एकाने कमेंट करत “उर्फी जावेदचा ड्रेस घातला आहे”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “उर्फीपासून ड्रेसची प्रेरणा घेतली आहे”, अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने “हा ड्रेस उर्फी जावेदने एकदा घातला होता”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर एका युजरने “सगळे जण उर्फीला कॉपी करत आहेत”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा>> वनिता खरातच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्यानेही हातावर काढली मेहेंदी

मलायका अरोरा सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसह रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा ते एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अर्जुन कपूरबरोबरच्या नात्याबाबत मलायका उघडपणे भाष्यही करताना दिसते.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 11:30 IST
ताज्या बातम्या