बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत मौनी रॉय हिचं नाव सामील आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. तर तिचं एअरपोर्ट लूकही अनेकदा चाहत्यांना आकर्षित करतो. पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

मौनी रॉय अनेकदा कामानिमित्त तर कधी कामाच्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढून सुट्ट्यांचा आनंद घ्यायला ती परदेशात जात असते. दरवेळी ती एअरपोर्टवर मीडिया फोटोग्राफर्सना पोज देते. परंतु आता तिच्या एका वेगळ्याच एअरपोर्ट व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे. ती विमानतळावर गेल्यावर तिच्या लक्षात आलं की ती तिचा पासपोर्ट घरीच विसरली आहे.

आणखी वाचा : Video: “२३-२४ वर्षांच्या मुलींबरोबर…” मौनी रॉय व सोनम बाजवाबरोबर शर्टलेस होऊन नाचल्याने अक्षय कुमारवर संतापले नेटकरी

मौनीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यात मौनी एअरपोर्टच्या आत प्रवेश करण्याच्या आधी सिक्युरिटी चेकिंग करायला गेली. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने तिच्याकडे तिचा पासपोर्ट चेक करण्यासाठी मागितला. तिने लगेचच बॅगेत तिचा पार्सपोर्ट शोधायला सुरुवात केली, पण तिला पासपोर्ट सापलडला नाही. शेवटी ती पासपोर्ट घरी विसरली असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यामुळे तिला एअरपोर्टच्या आता एन्ट्री नाकरण्यात आली.

हेही वाचा :

आता मौनीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करत काहींनी तिला ट्रोल केलं, तर काहींनी तिची मस्करी करत भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. पासपोर्ट घरी विसारल्याने मौनीला घरी परतावं लागलं.

Story img Loader