Mugdha Godse Shared New Post : अभिनयासह मॉडलिंग क्षेत्रातही सक्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे मुग्धा गोडसे. मुग्धाने मॉडलिंग क्षेत्रात तिची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने बॉलीवूड चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. यासह अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं तिच्या अकाउंटवर असलेल्या पोस्टमधून पाहायला मिळतं. अशातच तिने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मुग्धा गोडसे गेली अनेक वर्षे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राहुल देवबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या दोघांनी यापूर्वी त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिली आहे. तर दोघे बऱ्याचदा एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अशातच आज ७ जुलै रोजी मुग्धा गोडसेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे.
मुग्धाने यावेळी तिचा व राहुलचा एक गोड फोटो पोस्ट करत त्याला ‘१२ वर्षे’ असं कॅप्शन दिलं आहे. तिने याखाली राहुल देवला टॅग केलं आहे. मुग्धा व राहुलच्या रिलेशनशिपला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने या पोस्टखाली अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनीसुद्धा कमेंटमधून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुग्धा गोडसेबरोबरच्या रिलेशनशिपआधी राहुल देव याचं रीना देवसह लग्न झालं होतं. परंतु, रीना या कर्करोगाने ग्रस्त होत्या, यामुळे त्यांचं निधन झालं. राहुल व रीना यांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगाही आहे. रीना यांच्या निधनानंतर राहुल यांनी एकट्याने त्यांच्या मुलाचा सांभाळ केला.
रीना यांच्या निधनाच्या काही वर्षांनी राहुल देव मुग्धा गोडसेसह रिलेशनशिपमध्ये आले. गेली अनेक वर्षे हे दोघे एकमेकांसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. राहुल देव यांनी ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं. मुग्धा गोडसेनेसुद्धा यापूर्वी राहुल व तिच्या नात्याबद्दल मुलाखतींमधून स्पष्टपणे सांगितलं आहे.
दरम्यान, मुग्धा गोडसेच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती अभिनयासह प्रसिद्ध मॉडलसुद्धा आहे. मुग्धाने मधुर भंडारकर यांच्या ‘फॅशन’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यातील तिच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर तिने ‘ऑल द बेस्ट’, ‘जेल’, ‘हिरोईन’, यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.