परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा २४ सप्टेंबरला उदयपूरमध्ये थाटामाटात पार पडला. दोघांच्या शाही विवाहसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटी आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. उदयपूरच्या ‘द लीला पॅलेस’मध्ये दोघांच्या लग्नासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. अभिनेत्रीने सोमवारी सकाळी लग्न सोहळ्यातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
हेही वाचा : अभिनेत्री स्वरा भास्करने दिला गोंडस मुलीला जन्म, पहिला फोटो शेअर करत सांगितलं नाव…
थाटामाटात लग्न केल्यावर परिणीती आणि राघव आता दिल्लीत पोहोचले आहेत. लग्नानंतर आज अभिनेत्री पहिल्यांदाच सासरी जाणार आहे. नियॉन रंगाचा ड्रेस, हातात चुडा, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अशा पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री सासरी पोहोचली आहे.
हेही वाचा : Video : “वाहती नदी, चुलीवरचा भात अन्…”, मराठमोळा अभिनेता पोहोचला कोकणात; म्हणाला, “माझं गाव..”
परिणीती आणि राघवचे दिल्ली विमानतळावरील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अभिनेत्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. परिणीतीच्या मंगळसूत्रात इन्फिनिटी (Infinity symbol) चिन्ह पाहायला मिळत आहे. त्या इन्फिनिटी चिन्हाच्या बरोबर मधोमध गोलाकार हिरा असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. परिणीतीच्या साध्या आणि हटके मंगळसूत्राने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : ‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता झाली आहे मोठी! तेजश्री वालावलकरची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
दरम्यान, उदयपूरमध्ये थाटामाटात लग्न केल्यावर लवकरच हे जोडपं जवळच्या मित्रमंडळींना दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी रिसेप्शन पार्ट्या देणार आहे. राघव-परिणीतीच्या मुंबईतील रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हजेरी लावण्याची शक्यता आहे.