‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्री प्रीती झांगियानीचा पती अभिनेता परवीन डबासचा २१ सप्टेंबर रोजी भीषण अपघात झाला. मुंबईतील वांद्रेतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये तो आयसीयूमध्ये होता. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याने त्याच्या अपघाताचा घटनाक्रम सांगितला आहे. या कठीण प्रसंगाचे कथन त्याने स्वतःच केले आहे.
या अपघाताने धक्का बसला आहे, असं परवीन ‘बॉम्बे टाईम्स’शी म्हणाला. सकाळी ५ वाजता खार येथील त्यांच्या कार्यालयातून घरी परतत असताना अपघात झाला, असं त्याने सांगितलं. “दोन मुलांनी मला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. त्यांनी मला रस्त्याच्या कडेला बसवलं. ते रुग्णवाहिका बोलवण्याबद्दल बोलत होते ते मी ऐकल्याचं आठवतंय. त्यानंतर लगेच मला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं,” असं परवीन म्हणाला.
“माझा देव…पॅडी दादा”! घराबाहेर पडलेल्या पंढरीनाथ कांबळेसाठी सूरज चव्हाणची पोस्ट; म्हणाला, “मला कधी…”
“मी गाडी चालवत होतो आणि त्याच वेळी रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या वाहनाच्या लाइट्समुळे मला दुभाजक दिसले नाही आणि कार त्यावर आदळली. मी कामावरून परतत होतो आणि गाडी वेगाने चालवत नव्हतो, तरीही अपघात झाला. मी सध्या औषधं घेत आहे. मी जास्त चालू शकत नाही, काठीच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करतोय. आणखी १० दिवस मला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे,” असं परवीनने सांगितलं.
या कठीण प्रसंगात पत्नी प्रीती खंबीरपणे उभी राहिली आणि तिने मुलांना सांभाळलं, असं तिने सांगितलं. तसेच मुलांना त्याच्या अपघाताबद्दल माहीत नव्हतं. “माझ्या मोठ्या मुलाला त्याच्या मित्राचा मेसेज आला, ‘तुझ्या वडिलांबद्दल ऐकून वाईट वाटलं.’ त्याला वाटलं की मी मेलो. नंतर प्रीतीने त्याला माझ्या अपघाताबद्दल सांगितलं,” असं परवीन म्हणाला.
Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…
परवीन डबास ‘खोसला का घोसला’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. तसेच त्याने ‘रागिनी एमएमएस 2’ आणि ‘माय नेम इज खान’ या चित्रपटांत काम केलं होतं. तो नुकताच ‘मेड इन हेवन’ या प्राइम व्हिडीओच्या सीरिजमध्ये झळकला होता.