अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात राणी आईची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. तर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने अनेक मुलाखती दिल्या. तर आता तिने तिची लेक अदिरा हिच्या प्रायव्हसीबद्दल भाष्य होतं. राणी मुखर्जी हिने निर्माता आदित्य चोप्राशी लग्न केलं. तर त्यांना आठ वर्षाची मुलगीही आहे. राणीने तिची मुलगी आदिरा हिचे कधीही पापाराझींना फोटो काढू दिले नाहीत. आता तिने असं का केलं याचा खुलासा तिने केला आहे. आणखी वाचा : मोजकेच पण आशयघन चित्रपट करणारी राणी मुखर्जी आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क राणी मुखर्जी नुकतीच करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' या शोमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात ती म्हणाली, " इतकी वर्ष मी माझ्या मुलीला मीडियाच्यापासून दूर ठेवण्यात यशस्वी झाले." यावर करीना म्हणाली, "असं करण्यासाठी नक्कीच सुपर पॉवरची गरज आहे." त्यावर राणी म्हणाली, "नाही, सुपर पॉवर नाही. मी पापाराझींना खूप प्रेमाने सांगितलं की कृपया मुलीचे फोटो काढू नका. त्यांनीही होकार दिला आणि तेही खूप प्रेमाने. कारण त्यांना माहित आहे की मी आणि आदित्य आमचं वैयक्तिक आयुष्य लाईमलाईटपासून लांब ठेवतो." हेही वाचा : अजय देवगणच्या ‘भोला’पेक्षा ‘दसरा’ ठरला वरचढ! नानीच्या दाक्षिणात्य चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी पुढे राणी म्हणाली, "आदिराचं सामान्य पद्धतीने संगोपन करणं मला आवश्यक वाटतं. कारण जेव्हा तुम्ही प्रसिद्ध आईचे मुलं असता तेव्हा त्याच्याकडे सामान्य मुलापेक्षा जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. ती पण सामान्य मुलगी आहे हे आदिराला जाणवून देणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं." आता तिच्या या बोलण्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर तिच्या या बोलण्याचं कौतुक होत आहे.