Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर म्हटलं की डोळ्यांसमोर तिची एक खास इमेज उभी राहते. सई ताम्हणकरने तिच्या हिंमतीवर स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) ही अनेकांना आवडते अनेक जण तिला नावं ठेवतात. मात्र कुणाच्याही टीकेची पर्वा न करता सई ताम्हणकर तिचं काम करत राहते. तिच्या यशाचं रहस्यही हेच आहे. सई ताम्हणकरने आत्तापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे सई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
सई ताम्हणकरचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत
सई ताम्हणकरचा ( Sai Tamhankar ) घटस्फोट झाला आहे हे तिने आत्तापर्यंत अनेकदा विविध मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. अमेय गोसावीशी झालेलं तिचं लग्न मोडलं. तसंच त्यावेळी पार्टी वगैरे कशी झाली हे देखील सईने ( Sai Tamhankar ) सांगितलं आहे. अशात आता सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) आणि अनिश जोग हे दोघंही एकमेकांना डेट करत होते अशाही चर्चा रंगल्या. या दोघांचे फोटोही समोर आले. मात्र हे नातंही तुटल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत. सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) आणि अनिश जोग यांचं नातं तुटल्याच्या चर्चा रंगल्या आहेत याचं कारण आहे सईने ठेवलेलं स्टेटस. २०२२ मध्ये या दोघांचं नातं जुळल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता सई ताम्हणकरने जे स्टेटस ठेवलंय त्यामुळे या दोघांचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
हे पण वाचा- “आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिले जाते”, सई ताम्हणकरचे विधान; म्हणाली, “या गोष्टीकडे…”
सईने असं स्टेटस ठेवलं की रंगल्या ब्रेक अपच्या चर्चा
सईने दौलतराव सापडला असं म्हणत अनिशचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हा या दोघांच्या नात्याची सुरुवात झाली होती असं म्हटलं जातं. आता सईने #Trustory म्हणत एक स्टेटस शेअर केलं आहे. तसंच सईने तिच्या इन्स्टाग्रामवरचे अनिशसह असलेले सगळे फोटोही हटवले आहेत. त्यामुळे या दोघांचं नातं संपुष्टात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. I am Single By Choice. Not My Choice. But It’s Still A Choice अशा ओळी सईने लिहिल्या आहेत. तसंच #Truestory असंही म्हटलं आहे.
अनिश आणि सईचे फोटो व्हायरल
अनिश आणि सईचे त्यांच्या मित्र मैत्रीणींच्या लग्नातले पोस्ट केलेले फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्या लग्नातील फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याच्याही चर्चा होऊ लागली होती. सईच्या काही सिनेमांची निर्मिती ही अनिशने केली आहे. त्यामध्ये ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, ‘वाय झेड’ या सिनेमांचा समावेश आहे. पण सध्या त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र हे नातं तुटलं आहे की नाही हे अधिकृत रित्या सईने सांगितलेलं नाही.