scorecardresearch

“मी सुशांत सिंहकडून…” सारा अली खानने जागवल्या ‘केदारनाथ’च्या आठवणी

सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

“मी सुशांत सिंहकडून…” सारा अली खानने जागवल्या ‘केदारनाथ’च्या आठवणी
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

सारा अली खान ही आजच्या तरुण पिढीतली आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या कामांमुळे तर ती नेहमी चर्चेत असतेच पण त्याचबरोबर तिच्या फिटनेसच्या आवडीमुळेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. ‘केदारनाथ’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या संदर्भात तिने पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने चित्रपटाच्या सेटवरील आणि सुशांत सिंहबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

साराने चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली, “४ वर्षांपूर्वी माझे सर्वात मोठे स्वप्न साकार झाले होते. मी २०१७ सालात परत जाण्यासाठी काही करायला काहीही करेन, चित्रपटातील सीन्स पुन्हा चित्रित करायला मी तयार आहे. सुशांतकडून मी संगीत, चित्रपट , आयुष्य अभिनय, आकाश, तारेतारका असं बरंच काही शिकले. आयुष्यभरासाठीच्या या आठवणींना धन्यवाद,” अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच तिने चित्रपटाच्या दिग्दर्शकांचे आभार मानले आहेत.

अक्षय, टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी; पोस्टर आले समोर

‘केदारनाथ’ चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले होते. केदारनाथमधील महाप्रलयावर याचे कथानक बेतले होते.

साराने काही दिवसांपूर्वी तिच्या आगामी ‘ए वतन मेरे वतन’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात ती एका स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. तसेच ती आता अनुराग बासू यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 19:38 IST

संबंधित बातम्या